Aires Rodrigues On Mega Job Fair Dainik Gomantak
गोवा

Aires Rodrigues : महा रोजगार मेळाव्‍यावर 2.61 कोटी खर्च; आयरिश यांनी केला महाघोटाळ्याचा आरोप

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित केला होता महा रोजगार मेळावा

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील बेरोजगारांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेला महा रोजगार मेळावा हा नियोजित महाघोटाळा होता, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

या मेळाव्यावर सुमारे 2.61 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्‍यासाठी वित्त खात्याची मंजुरीही घेण्यात आली नाही, असा त्‍यांनी दावा केला आहे.

या मेळाव्यातून बेरोजगार गोमंतकियांना किती फायदा झाला, याची श्‍वेतपत्रिका काढण्यात यावी. या मेळाव्यासाठी पुरेसा वेळ असतानाही वित्त खात्याच्या मंजुरीशिवाय मेळावा आयोजित केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर 2022 मध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी ताळगाव येथील श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये महा रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी दोन महिन्यापूर्वीच प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या मेळाव्यावर येणाऱ्या खर्चाच्या मंजुरीसाठी वित्त खात्याची परवानगी घेण्यास खूप वेळ होता.

मात्र, त्याची मंजुरी न घेताच 2.61 कोटी खर्च करण्यात आले, असे आयरिश यांनी जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT