Goa Flight  Dainik Gomantak
गोवा

Goa Bangalore Flight: आता करा 1991 रुपयांत गोवा-बंगळूर विमान प्रवास

Goa Bangalore Flight: बसपेक्षाही स्वस्त दर: ‘मोपा’वर ‘फ्लाय 91’ कंपनीची सुविधा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bangalore Flight: सध्या बंगळूरमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. लोकांना व्यक्तिगत स्वच्छतेसाठीही पुरेसे पाणी मिळत नसल्याची खबर आहे. अशातच गोवा ते बंगळूर मार्गावर प्रवासासाठी बसपेक्षाही विमानसेवेचा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

नेटकरी बंगळूरला कसे जावे, पाण्याचा टॅंकर घेऊन जावे का? अशी खोचक विचारणा करू लागले असतानाच ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने गोवा ते बंगळूर हा विमान प्रवास १९९१ रुपयांना उपलब्ध केला आहे.

कर्नाटक परिवहन महामंडळाचे बस तिकीट या मार्गावर १ हजार २५७ रुपये तर खासगी बस ९९९ ते २ हजार ७०० रुपये आहे.

असे असताना विमान प्रवासाचा हा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मोपा विमानतळावरून सकाळी ७.५५ वाजता हे विमान निघते तर बस सायंकाळी बंगळूरला निघतात.

नव्याने सुरू केलेल्या विमानसेवेला लोकप्रियता लाभावी, यासाठी कंपनीने ही सवलतीतील तिकीट योजना लागू केली असली तरी बंगळूरमधील पाणी टंचाईच्या तोंडावर तिची मोठी चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली आहे.

बंगळूरमध्ये गेलात, तर दुसऱ्या दिवशी पाण्याअभावी गाशा गुंडाळावा लागेल, येताना तेवढीच स्वस्त तिकीट मिळेल काय? अशीही विचारणा अनेकजण करू लागले आहेत.

हैदराबाद, जळगाव, पुणे येथे ही विमान कंपनी आपली सेवा सुरू करणार आहे. त्या ठिकाणीही बससेवेपेक्षा कमी दरात विमानसेवा सुरु होईल का? याविषयी निश्चितपणे कुतूहल निर्माण झाले आहे.

लक्षद्वीपला थेट विमान सेवा

72 आसनी या विमानसेवेची बससेवेशी निश्चितपणे स्पर्धा होणार असल्याचे आताच दिसते. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्रस्थानी ठेवून ही विमान कंपनी आपली सेवा विस्तारणार आहे.

पुढील महिन्याच्या मध्यावर लक्षद्वीपलाही नियमित विमानसेवा मोपावरून सुरू होणार आहे. सध्या केवळ कोचीवरूनच लक्ष्यद्वीपला विमानसेवा आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT