Dubai to Goa flight halted Dainik Gomantak
गोवा

गोव्याला येणारं विमान दुबईतच थांबलं! 'Air India Express Flight'च्या तांत्रिक बिघाडाने खळबळ; अहमदाबाद दुर्घटनेनंतरही धडा नाहीच?

Air India Express Goa: प्रवाशांचा दावा आहे की त्यांना पर्यायी विमानाची कोणतीही व्यवस्था करून देण्यात आलेली नाही, ज्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झालीये

Akshata Chhatre

Air India Express: गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांच्या कारभारावरून देशभरात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यातच, एअर इंडिया एक्सप्रेसच्या दुबईहून गोव्याला येणाऱ्या IX-840 क्रमांकाच्या विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांचा दावा आहे की, त्यांना पर्यायी विमानाची कोणतीही व्यवस्था करून देण्यात आलेली नाही, ज्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झालीये.

तांत्रिक बिघाडाचे कारण, प्रवाशांची गैरसोय आणि वेळेत बदल

दुबईहून गोव्यासाठी निघणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे IX-840 हे विमान काही वेळाने उड्डाण करणार असल्याची बातमी प्रवाशांना मिळाली. हे विमान मूळतः सायंकाळी ५:४० वाजता (दुबई वेळ) सुटणार होते आणि रात्री १०:४० वाजता गोव्यात पोहोचणार होते, ज्यासाठी प्रवासाचा कालावधी ३ तास ३० मिनिटे होता. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे यात विलंब झाला आहे.

कंपनीने यामागे 'तांत्रिक बिघाड' असल्याचे कारण दिले असले, तरी प्रवाशांच्या मते त्यांना योग्य ती माहिती देण्यात आली नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गोव्याला पोहोचण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था तात्काळ पुरवली गेली नाही.

उलट, रद्दबातल झाल्याने त्यांना संध्याकाळी ६:३० पर्यंत विमान सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर गोव्यात रात्री ११:२० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज देण्यात आला. या विलंबामुळे दुबईमध्ये अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांना याचा मोठा फटका बसला, अनेकांचे नियोजित कार्यक्रम रद्द झाले, तर काही जणांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला.

अहमदाबाद दुर्घटनेची पार्श्वभूमी आणि वाढती चिंता

एकीकडे अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताची दुर्दैवी घटना ताजी असताना, दुसरीकडे एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांमध्ये होणारे तांत्रिक बिघाड आणि अचानक रद्द होणारे विमान प्रवास ही बाब प्रवाशांची चिंता वाढवणारी आहे.

अहमदाबाद दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, या घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल सामान्य नागरिकांमध्ये संवेदनशीलता वाढली आहे. प्रवाशांना योग्य वेळी माहिती देणे, पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि विशेषतः तांत्रिक बिघाड वारंवार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणे हे विमान कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: ट्राफिक जॅमची समस्या विसरा… गोव्यात 4 जलमार्गांवर सुरु होणार वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

Rajinikanth's Guru: हिमालयात गूढ गुहेत राहणारे, महादेवाचे अवतार मानले जाणारे 'रजनीकांत' यांचे अध्यात्मिक गुरु कोण आहेत?

Zuari Bridge Car Accident: झुआरी पुलावर बीएमडब्ल्यू कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

भिवपाची गरज आसा! गोव्यात कामगारांची पिळवणूक; विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर एकवटले

Hydroponic Farming: हायड्रोपोनिक्स! मातीविरहित शेती शिका, घरच्याघरी भाज्या मिळवा..

SCROLL FOR NEXT