भारतीय महिला लीग 2 साठी गोव्यात आलेल्या एका क्लबच्या दोन महिला फुटबॉलपटूंना मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी दीपक शर्माविरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली.
याप्रकरणी आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) मंगळवारी दीपक शर्माविरुद्ध कठोर कारवाई करत, त्यांना निलंबित केले आहे.
हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल क्लबच्या दोन महिला फुटबॉलपटूंनी दीपक शर्मा विरोधात तक्रार दाखल केली आहे. शर्माने दारु नशेत त्यांच्या हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केला आणि फुटबॉलपटूंना मारहाण करत त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा, आरोप त्यांनी केला.
एआयएफएफ कार्यकारी समितीने दीपक शर्मा यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मा यांना पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही फुटबॉल-संबंधित गोष्टींमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे, असे एआयएफएफने निवेदनात म्हटले आहे.
गोवा पोलिसांनी शनिवारी दीपक शर्माला अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 341 आणि 354A (लैंगिक छळ) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
यासह AIFF ने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 30 मार्च रोजी स्थापन केलेली तीन सदस्यीय समिती देखील विसर्जित केली आणि त्याऐवजी हे प्रकरण त्यांच्या शिस्तपालन समितीकडे पाठवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.