Ahsaan Qureshi Dainik Gomantak
गोवा

VIDEO: "गोव्यात ओला-उबरला का अडवता?" कॉमेडियनच्या रोखठोक प्रश्नावर टॅक्सी चालकाचं 'लय भारी' उत्तर! व्हिडिओ होतोय व्हायरल

Ahsaan Qureshi Goa Taxi Video: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेते एहसान कुरेशी यांचा गोव्यातील एका टॅक्सी चालकासोबतचा संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

पणजी: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेते एहसान कुरेशी यांचा गोव्यातील एका टॅक्सी चालकासोबतचा संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गोव्यातील विमानतळाबाहेर घडलेल्या या घटनेने राज्यामध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या 'ओला-उबर' (Ola-Uber) टॅक्सी वादाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. एहसान कुरेशी यांनी टॅक्सी चालकाला अतिशय मोकळेपणाने विचारलेल्या प्रश्नांमुळे पर्यटकांची बाजू आणि स्थानिक चालकांच्या अडचणी या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एहसान कुरेशी एका स्थानिक टॅक्सी चालकाला विचारतात की, "माझे अनेक मित्र गोव्याला येतात आणि तक्रार करतात की येथे ओला किंवा उबर का चालत नाही? तुम्ही लोक त्यांना येऊ का देत नाही?" यावर त्या टॅक्सी चालकाने अतिशय स्पष्टपणे आपली बाजू मांडली. चालकाच्या मते, गोव्यामध्ये जवळपास 25000 स्थानिक टॅक्सी चालक आहेत. जर ओला किंवा उबरसारख्या कंपन्या आल्या, तर त्यांचा मोठा हिस्सा कमिशनच्या रुपात कंपनीकडे जाईल. "आम्ही आमच्या मेहनतीने जेवढे कमावतो, त्यात आम्ही समाधानी आहोत. आमचा धंदा आम्ही बाहेरच्या कंपन्यांना का द्यावा?" असा सवाल चालकाने उपस्थित केला.

कुरेशी यांनी पुढे विचारले की, जर तुम्ही तुमची गाडी ओला-उबरला जोडली तर तुम्हाला दुप्पट धंदा मिळेल, असे वाटत नाही का? त्यावर चालकाने उत्तर दिले की, कमिशन कापल्यामुळे फायदा कमी होतो आणि त्यापेक्षा स्थानिक टॅक्सी युनियनच्या माध्यमातून काम करणे आम्हाला परवडणारे आहे. या संवादानंतर कुरेशी यांनी प्रेक्षकांना उद्देशून सांगितले की, "बाहेरुन येणाऱ्या लोकांना वाटते की गोव्याचे (Goa) टॅक्सी चालक दादागिरी करतात, पण त्यांची ही स्वतःची समस्या आणि आर्थिक गणिते आहेत. ते त्यांच्या कमाईत आनंदी आहेत." या व्हिडिओमुळे गोव्यातील टॅक्सी माफियांवरुन होणारी टीका आणि स्थानिक लोकांचे उपजीविकेचे प्रश्न यावर पुन्हा एकदा नवी चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT