Aguad Jail

 

Dainik Gomantak

गोवा

'आग्वाद कारागृहाचे' खासगीकरण होऊ देणार नाही; मायकल लोबो

राज्य सरकार सिकेरी येथील आग्वाद कारागृहाचे (Aguad Jail) खासगीकरण कदापि करणार नाही, असे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa: गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना माझे अभिवादन असल्याचे नमूद करून, राज्य सरकार सिकेरी येथील आग्वाद कारागृहाचे (Aguad Jail) खासगीकरण कदापि करणार नाही, असे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी स्पष्ट केले आहे. त्या कारागृहाला ऐतिहासिक महत्त्व आहे, असेही मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) म्हणाले.

म्हापसा (Mapusa) येथील सरकारी कार्यालय संकुल इमारतीसमोर गोवा मुक्तिदिनानिमित्त (Goa Liberation Day) आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, की पोर्तुगीज (Portuguese) काळात गोव्याच्या मुक्तिसंग्रमात ज्या वीर सैनिकांनी भाग घेतला, त्यांना तिथे डांबले होते. त्यामुळे हे कारागृह कधीच खासगीकरण होऊ देणार नाही, असेही मंत्री लोबो म्हणाले. या वेळी म्हापसाचे आमदार ज्योशुआ डिसोझा, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

मनरेगा योजनेंतर्गत ग्रामीण विकास विभागातील 250 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे व त्याची कार्यवाही लवकरच केली जाईल, असेही मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.

कोविड काळातही जनतेचे मनोधैर्य अबाधित

मंत्री लोबो म्हणाले, कोविडच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेत तसेच आताही कोविड यौद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे. अशा महामारीच्या कठीण काळात लोकांनी हार मानली नाही व त्यांचे मनोधैर्य अबाधित राहिले. जनतेने लसीकरण (Vaccination) मोहिमेत मनापासून भाग घेतला, असे म्हणत मंत्री लोबो यांनी गोमंतकीयांविषयी गौरवोद्गार काढले. गोव्यालाही मोठी झळ बसली. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे परिपालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT