Agonda  Dainik Gomantak
गोवा

Agonda News : आगोंदेश्वर देवस्थानामध्ये चोरी; फंडपेटी फोडली

Agonda News : : ८० हजार रोकडसह दोन लाखांचा ऐवज लंपास

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News :

आगोंद, येथील श्री आगोंदेश्वर देवस्थानात आज सकाळी ६.४५ वाजता चोरीची घटना उघडकीस आली. चोरांनी फंडपेटीतील सुमारे ८० हजारांच्या रकमेसह दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रमोद‌ देसाई यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवस्थानचे पुतू वेळीप नेहमीप्रमाणे सकाळी ६.४० च्या सुमारास श्री आगोंदेश्वर देवस्थानकडे पोहोचले. त्यांना देवालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप नसल्याचे आढळून आले. हे कुलूप कापून काढल्याचे त्यांच्या निर्दशनास आले.

पाठीमागे अभिषेकास वापरात आणले जाणारे तांब्याचे पात्र व आतील समईचे काही तोडलेले भागही दिसून आले. या प्रकाराबाबत त्यांनी स्थानिक महाजन नारायण देसाई आणि रामदास सावंत यांना सूचित केले. त्यानंतर‌ प्रथम आगोंद पोलिस चौकी व नंतर काणकोण पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. याठिकाणी दोन देवळांचा वर्धापन दिन सोहळा नुकताच झाला होता.

सहा वर्षांपूर्वीही झाली होती चोरी

हे देवस्थान लोकवस्तीपासून दूर आहे. ‌या देवस्थानात ६ वर्षांपूर्वीसुद्धा अशीच चोरी झाली होती. मात्र, चोर सापडले नव्हते.

यावेळी तपासणीसाठी आणलेले श्वान जवळच्या शेतात १०० मीटरपर्यंत घुटमळत नंतर परतले. ठसेतज्ज्ञांनीही ठसे घेतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT