Goa News : भाजप करणार ५० हजार सूचना संकलित : मुख्यमंत्री

Goa News : विकसित भारत रथयात्रेस प्रारंभ : उद्या मडगावात अभियान
Cm Pramod Sawant
Cm Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

पणजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शिवाय जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा जाहीरनामा तथा संकल्पपत्रात समावेश करण्याकरिता जनतेच्या सूचना संकलित करण्यात येणार आहेत.

प्रत्येक मतदारसंघातून एक हजार अशाप्रकारे राज्यभरातून ५० हजार सूचना संकलित केल्या जातील, त्यांची छाननी केल्यानंतर उर्वरित सूचना भाजपच्या निवडणूक समितीकडे पाठविल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विकसित भारत रथयात्रेची माहिती दिली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दत्ता खोलकर, दामू नाईक, सदस्य तथा मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते. विकसित भारत रथयात्रेस शनिवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ‘सूचना आपल्या-संकल्प आमचा’ या ब्रीदवाक्यानुसार केंद्रातील भाजप सरकारने अभियान राबविले आहे. मोदी सरकारच्या काळात जाहीरनाम्यात जे काही संकल्प केले होते, ते पूर्ण झाले आहेत. भाजप सरकारने जम्मू-काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत विकास साधला आहे.

लोकांकडून कल्पना याव्यात, त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा असतील त्यांचा त्यात समावेश असावा यासाठी प्रत्येक घटकाकडून आम्ही सूचना मागवत आहोत. हा जाहीरनामा लोकांचे संकल्पपत्र असावे यासाठी हा प्रयत्न आहे.

सूचनापत्र, मोबाईल नंबर, क्यूआर कोड यांच्या माध्यमातून सर्व घटक आपली सूचना मांडू शकणार आहेत. राज्यभरातून ५० हजार सूचना संकलित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप सरकार हे महिला, युवा, शेतकरी व गरीब कल्याण या चार घटकांवर काम करीत आहे. या सर्व घटकांनी आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

‘विकसित भारत, विकसित गोंय’ यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले. विकसित भारत रथयात्रेचा आज झेंडा दाखवून शुभारंभ झाला. सोमवारी सकाळी म्हापशात पत्रकार परिषद होऊन उत्तर गोवा जिल्ह्यातील यात्रेचा शुभारंभ होईल. उद्या (ता. ३) मडगावात यात्रेचा शुभारंभ होणार असल्याचेही खंवटे यांनी सांगितले.

Cm Pramod Sawant
Goa News : नौसेना युद्ध महाविद्यालय गोव्यात; ५ मे रोजी राष्ट्रार्पण

दोन्ही जागा भाजपच्याच खात्यात

भाजपने आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकूण चारशेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्याची घोषणा केली आहे. यंदाच्या ‘चारसौ पार’ घोषणेमध्ये गोव्याच्या दोन्ही जागांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या उत्तरावर आत्मविश्‍वासाने सांगितले.

मतदारसंघनिहाय यात्रेचे वेळापत्रक

उत्तर गोवा जिल्हा

४ रोजी पर्वरी, साळगाव

५ रोजी म्हापसा, थिवी, हळदोणा

६ रोजी कळंगुट, शिवोली

७ रोजी मये, डिचोली

८ रोजी साखळी

९ रोजी पर्ये आणि वाळपई

१० रोजी पेडणे

११ रोजी मांद्रे

१२ रोजी पणजी, ताळगाव सांताक्रूझ

१३ रोजी सांतआंद्रे, कुंभारजुवे

१४ रोजी पणजी

दक्षिण गोवा जिल्हा

४ रोजी मडगाव, फातोर्डा

५ रोजी कुडतरी व नुवे, नावेली

६ रोजी बाणावली, वेळ्ळी, कुंकळ्ळी

७ रोजी वास्को-मुरगाव

८ रोजी कुट्ठाळी व दाबोळी

९ रोजी काणकोण

१० रोजी सांगे

११ रोजी सावर्डे

१२ रोजी शिरोडा व मडकई

१३ रोजी फोंडा

१४ रोजी कुडचडे व केपे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com