Agond Panchayat  Dainik Gomantak
गोवा

Agond Panchayat : कोमुनिदाद जागेतील बांधकामे नियमित करावी

Agond Panchayat : :आगोंद पंचायत क्षेत्रातील नागरिकांची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतली भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Agond Panchayat : आगोंद पंचायत क्षेत्रातील काणकोण कोमुनिदादच्या जागेत असलेली बांधकामे नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली आहे. सरकारने आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी आगोंद पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी भुरीम येथील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी अॅड. फियोना रॉड्रिग्ज, पंच नीलेश पागी, फातिमा रॉड्रिग्ज, नंदकिशोर फळदेसाई, पार्वती पागी, रेमेतिना फर्नांडिस, कायतानी फर्नांडिस, आग्नेल फर्नांडिस व अन्य नागरिक उपस्थित होते.

कोमुनिदादची जमीन आमचीच आहे म्हणून या जागेत आम्ही घरे बांधली. पण ही घरे आज मोडणार उद्या मोडणार या भीतीने गेली कित्येक वर्षे आम्ही दिवस कंठत आहोत. सरकारने ही घरे कायदेशीर करावी, असे यावेळी सांगण्यात आले.

आगोंद पंचायत क्षेत्रातील ७८ घरे पाडण्यासाठी कोमुनिदाद प्रशासकांनी नोटीस बजावली असून या नोटिसाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असल्याची माहिती यावेळी नागरिकांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

संपादकीय: अहवालप्रवण प्रशासन

Indian Cricket Team: टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? खेळाडूंच्या वारंवार दुखापती अन् आता थेट राजीनामा, BCCIकडून निर्णय बाकी

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

SCROLL FOR NEXT