Goa Hasan Khan Murder Case 2013 Dainik Gomantak
गोवा

Hasan Khan Murder Case: मोठी बातमी! ताळगाव हसन खान खून प्रकरणी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

ताळगावचे रहिवासी असलेल्या हसन खान (वय 35) यांचा 21 मार्च 2013 साली खून झाला होता.

Pramod Yadav

Hasan Khan Murder Case: गोव्यातील ताळगाव येथे 2013 साली गाजलेल्या हसन खान खून प्रकरणात उच्च न्यायालयाने म्हत्वाचा निर्णय देत, या प्रकरणातील सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

ताळगावचे रहिवासी असलेल्या हसन खान (वय 35) यांचा 21 मार्च 2013 साली खून करण्यात आला होता. एका गॅरेजचे मालक असलेल्या खान यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

हसन खान खून प्रकरणात यापूर्वी संशयित रॉबर्ट गोन्साल्वीस आणि शिवाजी पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर पाच जणांना याप्रकरणी दोषी ठरवले होते, दरम्यान, या प्रकरणातील सर्वांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय.

हसन खान यांचा 2013 साली बांबोळी येथील होली क्रॉस चर्च परिसरात खून केला होता. खान यांचा मृतदेह कारमध्ये सापडला होता. आगशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी खाण खात्याचे माजी कर्मचारी रॉबर्ट गोन्साल्वीस, अभिनंदन पटेल, अनिल भुये, रवी पाटील, अरूण पाटील, शिवाजी पाटील आणि अनिकेत याल्लुरकर या संशयितांना अटक केली होती. या प्रकरणी आगशी पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात 9 जुलै 2013 रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात 740 पानी आरोपपत्र दाखल केले.

दरम्यान, याप्रकरणातील सर्व आरोपींची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Record: रेकॉर्ड ब्रेक! मिचेल स्टार्कनं रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज

FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

Goa vs Oman T20: गोव्याकडून ओमानला विजयाची 'भेट'; मोहित रेडकर, दीपराज गावकरचा बोथट मारा; क्षेत्ररक्षणही गचाळ

SCROLL FOR NEXT