Pilerne Berger Fire | Fire in Goa Paint Factory Dainik Gomantak
गोवा

Pilerne Berger Fire : बर्जर कंपनीत पुन्हा आग! अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

तपासणीसाठी कारखान्याचे निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक

Fire in Goa Paint Factory: पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर बेकर कोटिंग या पेंट कंपनीस लाग लागल्यानंतर कारखान्याने 7 व्या दिवशी पुन्हा आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावले आहे.

दुस-या फेरीची आवश्यकता भासल्यास पिळर्ण इंडस्ट्रियल इस्टेट येथे अग्निशामक यंत्रणा पुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासणीसाठी कारखान्याचे निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत.

माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वी बर्जर कंपनीला आग लागली होती. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ही भीषण आग रोखण्यात आली होती. दरम्यान, आगीत नुकसान झालेले सामान इतरत्र पडून होते. त्यातून धूर येऊन आजची आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

तरी वेळीच खबरदारी घेत अग्निशमन दलाला बोलावण्यात आले असून आग विझवण्यात आली आहे. कंपनीचे निरीक्षक संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करत असून अजून कुठे आग लागण्याची शक्यता आहे का हे तपासात आहेत.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी या आगीमुळे हवेत सर्वत्र धुराचे प्रमाण वाढले होते. यामुळे राज्याच्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हगे यांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. पिळर्ण येथील आगीच्या ठिकाणापासून दोन किलो मीटर परिघातील नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची सूचना जिल्हाधिकारी हगे यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT