School  Dainik Gomantak
गोवा

उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा किलबिलाट सुरु

नवीन धोरणानुसार वह्या, पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार असल्याचे खात्याने जाहीर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

School उन्हाळी सुट्ट्यांनंतर आज सोमवारी (दि. 5) में जून रोजी राज्यातील शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला. त्यानुसार शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहेत. बहुसंख्य मुले शाळा पुन्हा सुरू झाल्याने खूप उत्साही होती. तर काही मुले अजूनही सुट्टीच्याच मुडमध्ये होती.

सुमारे महिना, दिड महिनाभर सुट्टीचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थी आज पुन्हा एकदा सक्रीय झाले. सुट्टीच्या दिवसांत आपापल्या गावी गेलेले विद्यार्थी काल रविवारी संध्याकाळी घरी परतल्यानंतर आज त्यांनी शाळा गाठली.

सकाळी 7 वाजल्यापासून पालक आपल्या पाल्यांना शाळेत घेऊन जाताना दृष्टीपथास पडत होते. तसेच गेले दिड महिना बंद असलेली शालेय बसची वाहतूक आज सुरू झाली. त्यामुळे सकाळी 7 ते 8 ही वेळ वाहतूक कोंडीत गजबजून गेली होती. काही पालक चालत आपल्या मुलांना शाळेच्या वर्गात सोडून आले.

तर काही दुचाक्या, चारचाकी वाहने घेऊन मुलांना शाळेत सोडण्यास आले. खूप दिवसांनंतर भेट झाल्याने शालेय मीत्र मैत्रीणीच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. नंतर शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर मुलांची अॅसेब्ली सुरू झाली.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांना शाळेचे नियम व अटी सांगून झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले.नंतर मुलांनी आपापले वर्ग गाठले.अनुदानीत शैक्षणिक संस्थांमध्ये नर्सरी ते तिसरी पर्यन्तच्या वर्गासाठी यंदापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. परंतू या धोरणाची अंमलबजावणी 3 जुलैपासून करण्यात येणार आहे.

नवीन धोरणानुसार वह्या, पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार असल्याचे खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे या इयत्तामधील विद्यार्थ्यांनी पुस्तकांशिवाय शाळा गाठली. या इसत्तामधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये शालेय साहित्याच्या खरेदीबाबत संभ्रम पसरला आहे.

पालक शाळांमध्ये याबाबत माहिती घेण्यास मग्न आहेत. दरम्यान, शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी, रविवारी बाजारांमध्ये आजही गर्दी आढळून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT