bjp  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Politics: डिचोलीतील 'ते' नगरसेवक ‘ब्लॅक लिस्ट’वर! भाजप गोटात गंभीर चर्चा

Goa Politics: डिचोली पालिकेतील सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा पडला असला, तरी काही नगरसेवक मात्र भाजपच्या ''ब्लॅक लिस्ट'' वर गेल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Politics BJP Blacklist

डिचोली: डिचोली पालिकेतील सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा पडला असला, तरी काही नगरसेवक मात्र भाजपच्या ''ब्लॅक लिस्ट'' वर गेल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. तशी चर्चाही भाजप गोटात सुरु आहे.

नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षानी शिष्टाई करून पालिकेच्या चौदाही नगरसेवकांना एकसंघ करण्यात यश मिळवले असले, तरी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते काही नगरसेवकांवर नाराज आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात ज्यांनी आघाडी घेतली होती, त्यांपैकी तीन नगरसेवकांना पालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप पुरस्कृत गटात स्थान मिळणार की नाही, त्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

त्यामुळे हे नगरसेवक अडचणीत आले आहेत. गत पालिका निवडणुकीत डिचोली पालिकेवर भाजप पुरस्कृत गटाने वर्चस्व प्रस्थापित केले होते. चौदापैकी या गटाचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. निकालानंतर लगेच एका अपक्ष नगरसेवकाने भाजप गटाशी ''सोयरीक'' जुळवली होती. या गटातर्फे नगराध्यक्ष म्हणून कुंदन फळारी यांचे नाव पुढे येऊन त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कुंदन फळारी यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरवातीपासूनच काही नगरसेवक असंतुष्ट बनले होते. मात्र भाजपचे ‘कवच मिळाल्याने नगराध्यक्ष श्री. फळारी खुर्ची शाबूत राहिली.

डिचोली पालिकेत वर्चस्व प्रस्थापित केलेल्या भाजप गटात सारं काही व्यवस्थित आहे, असे वाटत असतानाच, पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या ९ डिसेंबर या दिवशी नगराध्यक्ष फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव झाला. भाजप पुरस्कृत गटातील विद्यमान उपनगराध्यक्ष दीपा पळ यांच्यासह राजाराम गावकर, तनुजा गावकर, निलेश टोपले, दीपा शिरगावकर, अनिकेत चणेकर यांच्यासह ॲड. रंजना वायंगणकर, ॲड. अपर्णा फोगेरी आणि गुंजन कोरगावकर या नऊ नगरसेवकांनी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला.

या घडामोडीनंतर भाजप गोटात हलचल निर्माण झाली. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी ही बाब कानावर घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह पक्ष नेतृत्वाने पालिकेतील अनपेक्षित राजकारणाची गंभीर दखल घेतली. पालिकेतील गुंताही सोडविला. मात्र भाजपलाच आव्हान दिलेल्या काही नगरसेवकांवर स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत.

...भाजपला ‘जड’ झाला!

भविष्यात हे नगरसेवक जड होण्याची शक्यता असल्याने आगामी पालिका निवडणुकीत या नगरसेवकांना भाजप पुरस्कृत गटात स्थान द्यावे की नाही, त्याबाबत भाजप गोटात गंभीर विचार चालू आहे. गत पालिका मंडळाच्या कार्यकाळातही एक नगरसेवक भाजपला ''जड'' झाला होता. मात्र नंतर भाजपतर्फे संबंधित नगरसेवकाचा नियोजनबद्धरीत्या पत्ता कट केला होता. ही पार्श्वभूमी पाहता, यावेळीही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT