Green Crackers  Dainik Gomantak
गोवा

Green Crackers in Goa: गोव्यातही हरित फटाक्यांचा वापर करण्याचा विचार

पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल-प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांत चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांपाठोपाठ आता गोव्यातही हवेचे कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्याचा विचार केला जात आहे. कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) ने असे 'हरित फटाके' बनवले आहेत. पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत या हरित फटाक्यांमुळे 30 टक्के कमी हवा प्रदुषण होते.

राज्याच्या जैवविविधता मंडळाच्या सोमवारी बैठक झाली. यात पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (जीएसपीसीबी) सदस्यांना हरित फटकांच्या विचार करण्याबाबत सुचविले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री काब्राल म्हणाले की, हवेचे प्रदुषण कमी कसे करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. आम्ही प्रदुषण नियंत्रण मंडळाला याबाबत विचारायचे ठरवले आहे. त्यावेळी एका सदस्यांनी हरित फटाक्यांचा पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. लवकरच याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील. त्यातून हरित फटाक्यांचे फायदे सांगितले जातिल.

सीएसआयआरने बनवलेले हरित फटाके कमी प्रदुषण करणारे आहेत. त्यासाठी वापरलेला कच्चा माल ही कमी प्रदुषण करणार आहे. त्यामुळे यातून वातावरणात बाहेर पडणारे घटक प्रदुषणासाठी कमी कारणीभूत ठरतील. याशिवाय या फटाक्यांचा आवाजही पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत 110-125 डेसिबलपर्यंतच असेल. पारंपरिक फटाक्यांचा आवाज 160 डेसिबलपर्यंत असतो.

गोव्यात बांबूपासून बनविण्यात येणारे फटाके फोडण्याचीही परंपरा आहे. अशा परंपरा पुनरूज्जीवीत करण्याची गरज आहे, असेही प्रदूषण मंडळाचे एक सदस्य म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT