aeroplane
aeroplane 
गोवा

विमाने,रेल्वे संख्येत आजपासून वाढ

Dainik Gomantak

पणजी

कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर देशात वाढत्या कोरोना विषाणू साथीमुळे पुन्हा टाळेबंदीत वाढ केली असली तरी विमान व रेल्वे वाहतूकच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यात उद्या १ जूनपासून विमाने व रेल्वे सेवेत वाढ होणार आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत ते गोव्यात आलेले प्रवासी असल्याने या वाढत्या वाहतुकीमुळे राज्याची चिंता आता अधिक वाढणार असली तरी सरकारने त्याला सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठेवली आहे.
कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली व मुंबईहून निघून गोव्यातून जाणाऱ्या रेल्वे मडगाव येथील रेल्वे स्थानकावर उद्या १ जूनपासून थांबा घेणार आहेत. यामध्ये मंगला एक्स्प्रेस (दिल्ली ते एर्नाकुलम), नेत्रावती एक्स्प्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनल - मुंबई ते तिरूवनंतपूरम व डुरांतो एक्स्प्रेस (निझामुद्दिन ते एर्नाकुलम) या रेल्वेंचा समावेश आहे. नवी दिल्ली ते वास्को ही रेल्वे उद्यापासून (१ जून) नियमित सुरू होणार आहे. या रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी येणार असले तरी त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य खात्याने प्रत्येक रेल्वे स्थानक तसेच विमानतळावर तपासणी केंद्रे स्थापन केली आहेत तसेच कोरोना चाचणी नेगेटिव्ह प्रमाणपत्र नसलेल्यांची मडगाव, म्हापसा तसेच गोमेकॉ इस्पितळात चाचणीची क्षमता नव्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे वाढविण्यात आली आहे. त्यामुळे एकाच दिवशी हजारापेक्षा अधिक चाचण्या करण्याची सोय उपलब्ध झाली आहे ही जमेची बाजू आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात आलेल्या प्रवाशांमधून कोरोना बाधित प्रवाशांची संख्या अचानक वाढल्याने राज्यासमोर चिंतेचा विषय बनला होता. गोवा सरकारने त्यावर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी मानक परिचालन सूचनेमध्ये परिस्थितीनुसार बदल केल्याने हे प्रमाण आटोक्यात आणण्यात सरकारला यश आलेआहे.
गोवा सरकारने मानक परिचालन सूचना (एसओपी) लागू केली त्यानुसार प्रत्येक प्रवाशाला गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी त्याने प्रवास सुरू
करण्याच्या ४८ तासापूर्वी आयसीएमआर लॅबमधून कोरोना चाचणी केलेला नेगेटिव्ह अहवाल प्रमाणपत्र सादर करावा अन्यथा त्यांना गोव्यात ही चाचणी दोन हजार शुल्क आकारून करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला ही चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. उद्या १ जून रोजी दुबईहून गोव्यात विमान येणार आहेत त्यामध्ये मध्यपूर्व देशातील भारतीयांचा समावेश असणार आहे. तसेच श्रीलंकेहून दोन विमाने येणार असून त्यामध्ये सुमारे २०० भारतीय प्रवासी असतील. ही सर्वजण विविध विदेशी क्रुझ बोंटीवर काम करणारे दर्यावदी असतील. हे दर्यावर्दी गेल्या दोन महिन्यांपासून कोलंबो येथे अडकून पडलेले आहेत. तीनवेळा श्रीलंकेहून गोव्यात येणारे विमान रद्द करण्यात आले मात्र त्यांनी सुरू ठेवलेल्या प्रयत्नांमधून अखेर यश लाभले. याव्यतिरिक्त लंडन येथून गोव्यात येण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रतिक्षेत विमाने आहेत. आतापर्यंत परदेशात कामाला असलेले सुमारे ८०० हून अधिक गोमंतकिय गोव्यात पोहचले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

SCROLL FOR NEXT