सत्तरी: अडवईत अनेक शेतकरी सरकारच्या जल सिंचन खात्याची पाणी योजनांवर अवलंबून आहेत, मात्र त्यांच्या शेतीला अद्याप पाणी पुरवठा झालेला नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकरी यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवत आहेत.
भीमराव राणे नावाच्या एका स्थानिक शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अडवईत जल सिंचन पाणी योजनेच्या अंतर्गत अजूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. पाण्याच्या या समस्येबद्दल प्रश्न करावा म्हटलं तरीही उत्तर देणारं असं कुणीही नाहीये. अधिकारी केवळ फोनवर चर्चा करत उडवाउडवीची उत्तरं देतायत.
जल सिंचन खात्याच्या ऑफिसला भेट द्यायचं म्हटलं तरीही तिथे संपर्क क्रमांक, वेळ किंवा इतर माहिती देणारी साधनं उपलब्ध नाहीयेत. सरकार कडून आलेला पैसा हे अधिकारी लुटत आहेत असा आरोप त्यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर केलाय. हि योजना जर का चालणारच नसेल तर निदान तशी माहिती द्यावी, कारण पाणी पुरवठा न झाल्यास आम्हाला शेती सोडावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
माणिकराव राणे नावाच्या आणखीन एका स्थानिक शेतकऱ्याने त्यांची व्यथा मांडली, ते म्हणतायत की जानेवारी महिना अर्धा झाला तरीही अद्याप जल सिंचन खात्याच्या पाणी योजनांवर अवलंबून असलेले शेतकऱ्यांचे संकट दूर झालेले नाही.
२० ते २२ दिवसानंतर जर का शेतीला पाणी मिळालं तर अशा परिस्थितीत शेती मारून जाईल. याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार देविया राणे यांची भेट घेतली होती, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांच्या आदेशाचं पालन केलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चार दिवसांपूर्वीच पाणी सुरु केलेलं आहे मात्र शेतकरी म्हणतायत की अद्याप हे पाणी त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचलेलं नाही.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही काळापूर्वी इथे जवळपास साठ शेतकरी होते मात्र पाण्याची समस्या पाठ सोडत नसल्याने आता केवळ ३५ शेतकरी या व्यव्यसायात बाकी राहिले आहेत. सध्या प्राण्यांकडून शेतीला भलंमोठं नुकसान होतंय आणि आता पाण्याची समस्या देखील हैराण करत आहे. परिस्थितीत म्हणावा तसा बदल न झाल्यास राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील शेतीचा व्यवसाय सोडावा लागेल.अडवई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिकांनी त्यांची समस्या मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.