Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! न्यायमंदिरातच महिला वकिलांचा विनयभंग, सोकावलेला प्रभू पुन्हा अटकेत

Goa Crime News: प्रीतेश प्रभू याच्या विरोधात यापूर्वी देखील महिला वकिलाचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

Pramod Yadav

मडगाव: न्यायालयात महिला वकिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मडगाव, गोव्यातून समोर आली आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी देखील संशयिताने अशाप्रकारे कृत्य केल्याची नोंद असून, यापूर्वी देखील त्याला अटक करण्यात आली होती.

व्यावसायाने वकील असणाऱ्या प्रीतेश जयंत प्रभू (३४, बागा दवर्ली, नावेली सासष्टी) याला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे.

मडगावच्या दिवाणी न्यायालयात बाकावर बसलेल्या महिलेचा संशयित प्रभूने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार फातोर्डा पोलिसांनी प्रभूला अटक केली आहे.

प्रीतेश प्रभू याच्या विरोधात यापूर्वी देखील महिला वकिलाचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, यानंतर पुन्हा एकदा त्याने महिला वकिलांचा विनयभंग केल्याने त्याला अटक करण्यात आलीय.

प्रीतेश प्रभू विरोधात नव्या भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ७५ (१) (II) आणि ७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांतील सुखदा प्रभूदेसाई अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

SCROLL FOR NEXT