Adv yatish naik to join BJP today  Dainik Gomantak
गोवा

यतीश नाईकांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश

काही दिवसांपूर्वी त्यांनी तृणमूलला केला होता रामराम

दैनिक गोमन्तक

ॲड. यतीश नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. काँग्रेस सोडून ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते. पण काही दिवसांनंतर त्यांनी तृणमूलला रामराम दिला होता. आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. याला कार्यकत्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला. भाजपने (BJP) राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. निवडणुका झाल्यापासून हा पहिलाच पक्ष प्रवेश आहे. यानंतर देखील अनेक नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

गोवा तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरचिटणीस यतीश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला होता. पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या दोन यादीतून वगळलेल्या नाईक यांनी अखेर राजीनामा दिला होता. निवडणुका लढवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने (Congress) त्यांना जागा देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप त्यांनी केला.

कोलकाता येथे ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांच्यासह टीएमसीमध्ये सामील झालेल्या पहिल्या नऊ लोकांपैकी नाईक एक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT