एनआरएआयचे सरचिटणीस ॲड. कन्वर सुलतान सिंग यांच्यासमवेत सचिव ॲड. विक्रम भांगले Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे ॲड. भांगले राष्ट्रीय रायफल संघटनेच्या सचिवपदी बिनविरोध निवड

मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या निवडणुकीत ॲड. भांगले यांची राष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या या महत्त्वाच्या पदावर निवड झाली.

दैनिक गोमन्तक

पणजी- रायफल शुटिंग (Rifle shooting) असोसिएशन, गोवाचे (Goa) सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक ॲड. विक्रम (मेघ:शाम) भांगले यांची भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) सचिवपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या निवडणुकीत ॲड. भांगले यांची राष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या या महत्त्वाच्या पदावर निवड झाली.

सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे भांगले यांचे भारतीय नेमबाजीच्या विकासात भरीव योगदान राहिले आहे. गोव्यातही गेली ३३ वर्षे नेमबाजी क्रीडा प्रकाराचा प्रसार करण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. ते भारतीय नेमबाजी आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय नेमबाजी पंच असून त्यांनी भारतीय कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक म्हणून यापूर्वी काम केलेले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रेंज ऑफिसर व पंच म्हणून काम केलेले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये दक्षिण कोरियातील सोल, जर्मनी, चेक प्रजासत्ताक, दोहा (कतार), मेक्‍सिको, सिंगापूर आदी देशांत भारतीय संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. या स्पर्धांत भारतीय संघाला अनेक पदके मिळालेली आहेत. त्यांची अकापुल्को (मॅक्‍सिको) येथे झालेल्या शॉटगन वर्ल्डकपसाठी भारतीय वरिष्ठ शॉटगन संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली होती. पुणे येथे सातव्या व्या अखिल भारतीय पोलिस शुटिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलिस दलाने स्पर्धा अधिकारी म्हणून निवड केली होती.

दिल्ली येथे आठव्या एशियन एअर वेपन शुटिंग स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड केली होती. आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी व बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ज्यूरी म्हणून निवड झाली होती. याशिवाय दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेतही त्यांनी दोनवेळा रेंज ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. जर्मनीतील इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्टस फेडरेशनने त्यांची जागतिक युवा नेमबाजी स्पर्धेसाठी रेंज ऑफिसर म्हणून निवड केली होती.

सलग पाचव्यांदा राष्ट्रीय संघटनेवर ॲड. विक्रम भांगले हे सलग पाचव्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या कार्यकारिणीवर प्रतिनिधित्व करीत आहेत. रायफल शुटिंग असोसिएशन गोवाचे सरचिटणीस, एनसीसी महाराष्ट्राचे प्रशिक्षक, गोवा राज्य नेमबाजी संघाचे प्रशिक्षक या नात्याने त्यांनी छाप पाडली आहे.

जर्मनीतील इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्टस फेडरेशनचे ते मान्यताप्राप्त ज्युरी असून जागतिक नेमबाजी संघटनेने त्यांची ज्युरी या नात्याने निवड केली आहे. विक्रम रॉयल रायफल शॉटगन शुटिंग क्‍लबचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक प्रशिक्षणार्थींनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेमबाजीत सुवर्णपदके प्राप्त केलेली आहेत. रायफल शुटिंग असोसिएशन गोवाचे सचिव राजेश परब यांनी ॲड. भांगले यांचे बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT