Adv Aires Rodrigues Dainik Gomantak
गोवा

दुहेरी नागरिकत्वप्रकरणी आयरिश रॉड्रिग्ज अडचणीत

सुनावणीचा मार्ग मोकळा : राज्य सरकारची परवानगी

दैनिक गोमन्तक

पणजी : सात वर्षांपूर्वी जुने गोवे पोलिसांत ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्यावर दाखल झालेल्या दुहेरी नागरिकत्व तक्रारीवरील सुनावणी घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने गेली कित्येक वर्षे परवानगीसाठी प्रलंबित असलेली ही सुनावणी दिवाणी न्यायालयात सुरू होणार आहे.

2016 साली कोलवा पंचायत सदस्य कल्वर्ट गोन्साल्वीस याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्याविरुद्ध दुहेरी नागरिकत्व असल्याची तक्रार जुने गोवे पोलिसात दाखल केली होती. रॉड्रिग्ज यांच्या जन्माची नोंद पोर्तुगीज येथील सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये नोव्हेंबर 1987 साली नोंद झाली आहे व तेव्हापासून त्यांच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्व असल्याचा दावा केला होता. याशिवाय त्यांनी या पोर्तुगीज नागरिकत्वाच्या आधारे पोर्तुगीज ओळखपत्र (बिलेत दी आयडेंटीडेड) मिळवले होते. त्यांनी ते 2010 मध्ये मिळवले व त्याची मुदत 2015 पर्यंत होती. पोर्तुगीज नागरिकत्व असताना ते भारतीय नागरिकत्वाचा वापर करत होते. दुहेरी नागरिकत्वाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याची चौकशी करण्याची मागणी गोन्साल्वीस यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात आला होता. रॉड्रिग्ज यांनी जिल्हाधिकारी तसेच मुंबई उच्च न्यायालयातही या प्रकरणाला आव्हान दिलेले आहे.

या प्रकरणाच्या चौकशीवेळी क्राईम ब्रँचने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांना बोलावण्यात आले होते. ते पोलिसांसमोर उपस्थित राहून त्यांना जे समन्स बजावण्यात आले आहे ते इतर दिवशीचे दिले जावेत. त्यांना न्यायालयात त्यांच्याकडे असलेल्या प्रकरणांची सुनावणी असल्याने पुढील तारीख देण्याची मागणी केली होती. क्राईम ब्रँचने प्राथमिक चौकशी करताना इंटरनॅशनल पोलिस ऑर्गनायझेशनकडून माहिती घेतली होती.

इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार, रॉड्रिग्ज यांनी पोर्तुगीज पासपोर्ट तसेच नागरिकत्व घेतले होते व त्याचा वापर त्यांनी पोर्तुगीजमध्ये प्रवास करण्यासाठी केला होता. या प्रकरणाच्या अधिक तपासकामासाठी क्राईम ब्रँचने 2017 मध्ये केंद्र सरकारची परवानगी मागितली होती. त्यांच्याकडे असलेला पासपोर्ट व नागरिकत्व याची पडताळणी करण्यास सुरवात झाली होती. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठीची परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT