Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: नराधम भावांसह बापाकडून दत्तक मुलीचे लैंगिक शोषण

Goa Crime News: आगशी पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीतील संतापजनक प्रकार

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: बाप आणि दोन भावांकडून 14 वर्षीय दत्तक मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तिसवडीत उघडकीस आली आहे. हा अत्याचार सुमारे दोन वर्षापासून सुरू असून पीडित मुलीने शेजाऱ्यांना आपली व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी एका बिगरसरकारी संस्थेला (एनजीओ) सूचित केले. तिन्ही संशयित आरोपींविरोधात आगशी पोलिस स्‍थानकात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

या कुटुंबात पती, पत्नी, दोन मुलगे आणि दत्तक घेतलेली मुलगी असे पाच सदस्य आहेत. रविवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी एका भावाने मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याने ती शेजारच्या घरात निघून गेली. तेथे शेजाऱ्यांनी विचारल्‍यावर तिने घडलेला प्रकार सांगितला.

ताबडतोब एनजीओला कल्‍पना देण्‍यात आली. पीडित मुलीने एनजीओला संपूर्ण घटना सांगताना बाप-लेकांच्‍या कृत्‍यांचा पाढाच वाचला. दरम्‍यान, एनजीओशी बोलल्यानंतर पोलिसांना कल्‍पना देण्‍यात आली. तसेच बाप-लेकांविरोधात रितसर तक्रारी दाखल करण्‍यात आल्‍या आहेत, असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

2021 पासून जबरदस्‍तीने ठेवले संबंध

अत्याचाराची सुरूवात मार्च 2021 मध्ये झाली, जेव्हा एका भावाने मला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आणि नंतर तिच्याशी जबरदस्‍तीने लैंगिक संबंध ठेवले. वडील आणि दुसरा मुलगा (अल्पवयीन) यांनीही अनेकदा लैंगिक अत्याचार केला. आईला अत्याचाराबद्दल माहिती नव्हती, कारण ती कामानिमित्त घराबाहेर असायची, असे पीडित मुलीने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nano Banana Image: नवीन ट्रेंड आला! AI वरून 15 रंगांच्या साड्यांमधले फोटो बनवले; गरजेचा, सुरक्षेचा विचार कुणी केला का?

Dashavtar Movie: गोव्यातल्या लोकांनाही आपला वाटेल असा, पर्यावरणाची ‘दशा’ दाखवणारा 'दशावतार'

Parshuram Statue: चोपडे सर्कलवर उभारणार परशुरामाचा पूर्णाकृती पुतळा! जीत आरोलकरांना दिली माहिती; जानेवारीपर्यंत करणार काम पूर्ण

Assonora: 'हा तर ग्रामस्थांची घरे व रोजगार हिसकावण्याचा प्रयत्न', अस्नोडातील नोटिसींविरोधात परब आक्रमक; RGPतर्फे आंदोलन

Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

SCROLL FOR NEXT