Goa B.Pharm Admission | JEE | NEET Dainik Gomantak
गोवा

Goa Admission: आता जेईई मेन किंवा NEET परीक्षेतून B.Pharm अभ्यासक्रमासाठी प्रवेश; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

फिजिक्स, केमिस्ट्रीतील गुण ठरणार महत्वाचे

Akshay Nirmale

Goa B.Pharm Admission: तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) विद्यार्थ्यांसाठी एक स्मरणपत्र जारी केले आहे. त्यानुसार 2024-25 पासून गोवा कॉमन एंट्रन्स टेस्ट (GCET) बंद करण्यात आल्यामुळे BPharm अभ्यासक्रमासाठीचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई-मेन 2024 किंवा NEET 2024 परीक्षेतून होतील .

राज्यात 2024-25 मध्ये फार्मसी विषयातील बीफार्म पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश जेईई-मेन 2024 किंवा एनईईटी 2024 या परिक्षांमध्ये भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयांतील सर्वोत्तम एकूण गुणांच्या आधारे केले जातील.

डीटीईने या नोटीशीत म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना BPharm अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी जेईई-मेन 2024 किंवा NEET-2024 किंवा दोन्ही पर्याय निवडावेत.

जर एखाद्या विद्यार्थ्याने JEE-Main आणि NEET या दोन्ही परीक्षांचे उत्तर दिले, तर ते BPharm सीटसाठी त्यांना ज्या परिक्षेत सर्वोत्तम गुण आहेत, त्या गुणांसह अर्ज करू शकतात.

अलिकडच्या वर्षांत गोव्यात बीफार्मच्या प्रथम वर्ष आणि राज्य संस्थांमधील बीई प्रोग्रामच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी GCET आयोजित केली जात होती.

2024 पासून, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जेईई-मेन द्यावी लागेल.

राज्यातील 2024-25 मध्ये अभियांत्रिकी बीई पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जानेवारी 2024 आणि एप्रिल 2024 मध्ये घेण्यात येणार्‍या जेईई-मेन 2024 मधील स्कोअर/रँकच्या आधारावर केले जातील.

इच्छुकांनी अभियांत्रिकी बीई पदवी अभ्यासक्रम परीक्षा योजना, पात्रता, अभ्यासक्रम, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि इतर संबंधित माहितीसाठी https://jeemain.nta.ac.in या वेबसाइटवर अधिसूचित JEE-Main च्या माहिती बुलेटिनचा पूर्ण अभ्यास करावा, असे डीटीईने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT