Morjim Panchayat News | Goa Panchayat Dainik Gomantak
गोवा

राज्यातील पंचायतींवर आजपासून ‘प्रशासक राज’

आज, उद्या घेणार आपल्या पदाचा ताबा; पंचायतींमध्ये प्रत्यक्ष हजर राहून कामकाज पाहणार

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात मुदत संपलेल्या 175 पंचायतींवर संचालनालयाने अखेर सरकारी अधिकाऱ्यांना पंचायत प्रशासक म्हणून नेमण्याची घोषणा शुक्रवारी केली. दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आता हे प्रशासक आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी आपल्या प्रशासक पदाचा ताबा घेणार आहेत. (Morjim Panchayat News)

पंचायत संचालनालयाने राज्यात 175 पंचायतींवर राज्य सरकारच्या विविध सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. हे अधिकारी आज आपल्या पदाचा ताबा घेतील. सरकारी नियमानुसार, मंगळवार गुरुवार आणि शनिवारी हे सरकारी अधिकारी संबंधित पंचायतींमध्ये प्रत्यक्ष हजर राहून पंचायतींचे कामकाज पाहणार आहेत. दरम्यान पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी ही प्रशासक जास्तीत जास्त सहा महिन्यासाठी नेमली असून तत्पूर्वी राज्यात ओबीसी संदर्भातील माहिती गोळा करण्यात येईल येईल आणि तातडीने राज्यातील पंचायतींच्या निवडणुका घेण्यात येतील अशी माहिती दिली आहे. (Goa Panchayat)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT