Electricity Bill Dainik Gomantak
गोवा

Goa News: पैंगीण-लोलयेतील वीजवाहिनी प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी

काणकोण तालुक्यातील पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रातील भुमीगत वीज वाहिनी प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण तालुक्यातील पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रातील भुमीगत वीज वाहिनी प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रात यापूर्वीच भूमीगत वीज वाहिन्या घालून वीजपुरवठा सुरू केल्याने या भागातील खंडीत वीज पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघाला आहे.पैंगीण व लोलये पंचायत क्षेत्रात 37 कोटी 1 लाख 75 हजार 708 रूपये खर्चून भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात येणार आहेत.

(Administrative approval for Paingin-Lolaye power line proposal in goa )

वीज खात्याचे निवृत्त कार्यकारी अभियंता संतोष लोलयेकर यांनी हा प्रस्ताव तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.आगोंद पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्या घालण्याची मागणी आहे.त्या पंचायत क्षेत्राचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे येणाऱ्या काही दिसांत या प्रस्तावाला प्रशासकीय मिळणार असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.

खोतीगाव पंचायत क्षेत्रात केरी या दुर्गम डोंगर माथ्यावरील वाड्यावर अद्याप वीज पुरवठा झाला नाही या वाड्यालाही भूमिगत वीज वाहिन्याद्वारे वीज जोडणी देण्याची मागणी येथील रहिवाशांनी सभापती कडे केली आहे.त्या वाड्यालाही थोड्याच कालावधीत वीज जोडणी मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT