Political Reservation Dainik Gomantak
गोवा

Political Reservation: ‘आदिवासी एकता परिषद’चा राजकीय आरक्षण लढ्याला पाठिंबा

Political reservation:आदिवासी एकता परिषद या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेने गोव्यात राजकीय आरक्षणासाठी सुरू असलेल्या अनुसूचित जमातीच्या लढ्यास पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Political reservation: आदिवासी एकता परिषद या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेने गोव्यात राजकीय आरक्षणासाठी सुरू असलेल्या अनुसूचित जमातीच्या लढ्यास पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी एकता परिषदेचे सरचिटणीस व संस्थापक सदस्य अशोक चौधरी यांनी सांगितले.

त्यांच्या समवेत माजी अध्यक्ष राजीव पांढरे व युवा विभागाचे अध्यक्ष जयदीप पाटील उपस्थित होते. तत्पूर्वी मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राईब ऑफ गोवाचे अध्यक्ष जुवांव फर्नांडिस व प्रवक्ते गोविंद शिरोडकर यांनी आदिवासी एकता परिषदेला पाठिंब्यासाठीचे निवेदन अशोक चौधरी यांच्याकडे सादर केले.

चौधरी यांनी सांगितले की, आम्ही गोव्याची मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान व गोव्याच्या राजयपालांपर्यंत पोहोचवू. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे. आमच्या पाठिंब्यामुळे या मागणीला आणखी धार येईल.

राज्य सरकारने गोव्यातील अनुसूचित जमातीची राजकीय आरक्षणाची मागणी केंद्र सरकारच्या कानावर घालून ती मान्य करून घ्यावी, असेही चौधरी यांनी सांगितले.

5 फेब्रुवारीला विधानसभेवर मोर्चा

मिशन राजकीय आरक्षणाचे प्रवक्ते गोविंद शिरोडकर यांनी सांगितले की ५ फेब्रुवारी रोजी शांती मोर्चा विधानसभेवर नेला जाईल व या मोर्चाला आदिवासी एकता परिषदेचा पाठिंबा आहे. आम्ही कित्येक मार्गाने राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.

मात्र सरकार त्यावर गंभीर नसल्याचे वाटते, असे शिरोडकर यांनी सांगितले. जर मोर्चानंतरही सरकारने काहीही हालचाल केली नाही, तर नंतर आमचे पुढचे पाऊल काय असेल, हे नंतर जाहीर केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT