Actresses Dia Mirza and Richa Chadha have both tweeted to save Mole
Actresses Dia Mirza and Richa Chadha have both tweeted to save Mole 
गोवा

मोले अभयारण्य रक्षणार्थ बॉलिवूड...

गोमंतक वृत्तसेवा

पणजी: नैसर्गिक जैवविविधतेचे माहेरघर असणारे पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान परिसरात राष्ट्रीय महामार्ग ४-ए चे रुंदीकरण, रेल्वे रुळाचे दुपदरीकरण तसेच नवीन विद्युत प्रसारकाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ५५ हजार झाडांची कत्तल करण्यात येणार असून हजारो नैसर्गिक जीवांचा अधिवास हिसकावून घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून विरोध होत असून आता बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्यांचा विरोध दर्शवित आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा आणि रिचा चढ्ढा या दोघीनी ट्विट करून मोले वाचविण्यासाठीची विंनती केली आहे. 


काश्मीर असो, आरे अथवा मोलेचा प्रश्न असो आम्हाला वनसंपदा वाचवलेली हवी आहे. सध्या खूप वनसंपदा राहिलेली नसून जर झाडे राहिली नाहीत तर आपण मरून जाऊ आणि हा मृत्यू कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे मागणार नसल्याचे ट्विट अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने केले आहे. 
दरम्यान, एका वरिष्ठ महिला पत्रकाराने उचललेल्या मोलेच्या प्रश्नाला खुले समर्थन अभिनेत्री दिया मिर्झा हिने दर्शविले आहे. प्रमुख माध्यमे या प्रकरणाकडे कमी लक्ष देत असून तुम्ही लक्ष दिले यासाठी धन्यवाद असे ट्विट दिया मिर्झा हिने केले आहे. 


या दोन्ही ट्विटच्या समर्थनार्थ कमेंट पडल्या आहेत. प्रकल्पांच्या नावाखाली स्वतःच्या लागेबंध असणाऱ्या कंपन्यांच्या झोळ्या भरण्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा बळी देण्यात आला. मोप विमानतळाच्या बांधकामाच्या नावाखाली शेकडो झाडांच्या कत्तली केल्या. त्याशिवाय येथील स्थानिक आदिवासी लोकांना जबरदस्तीने स्थलांतरित करण्यात आले. आता आपण शांत राहिलो तर याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल. आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला जर प्रदूषणविरहीत परिसर यावा असे आपल्याला वाटत असेल, तर आपण ही चळवळ सक्षम पद्धतीने पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य असल्याच्या अनेक टीका येथे स्थानिकांनी केल्या टीका येथे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

SCROLL FOR NEXT