Poonam Pandey Goa Video  Dainik Gomantak
गोवा

Poonam Pandey Goa Video: पूनम पांडेने अलिकडेच दिली होती गोव्यातील कॅसिनोला भेट, पाहा व्हिडिओ

Poonam Pandey Goa Video: पूनम पांडेने अलिकडेच गोव्यातील एका कॅसिनोत गेस्ट म्हणून हजेरी लावली होती.

Pramod Yadav

Poonam Pandey Goa Video: बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेचे गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे. 32 वर्षीय पांडेच्या अचानक निधनामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली.

सकाळी तिच्या सोशल मिडिया टीमने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. पूनमचे अचानक निधन सर्वानांच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले आहे.

पूनम पांडे अलिकडेच गोव्यात आली होती. पूनमने एका कॅसिनोत गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ पूनमने सोशल मिडियावर शेअर केला होता.

यात पूनमने सफेद रंगाचा ड्रेस आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केल्याचे दिसत आहे. मांडवीतील कॅसिनो आणि त्यामागे मनमोहक दृष्य दिसत आहे.

पूनम नेहमीच गोव्यात कॅसिनोच्या कार्यक्रमांसाठी हजेरी लावत असते. यापूर्वीही तिने विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली होती.

पूनम पांडे तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध होती. 2011 च्या विश्वचषक भारताने जिंकल्यास ती कपडे काढून टाकेल असे वक्तव्य तिने केल्यानंतर ती वादात सापडली होती. दरम्यान, तिच्या अचानक निधनामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.

पूनमने 'नशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने होस्ट केलेल्या लॉक अपच्या पहिल्या सीझनमध्ये पूनम दिसली होती. यात ती जिंकू शकली नसली तरी तिची लोकप्रियता वाढली.

कंगना राणौतच्या लॉक अपचा पहिला सीझन स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT