Nagarjuna  Dainik Gomantak
गोवा

Nagarjuna House Goa: सिनेस्टार नागार्जुनच्या घर बांधकामाची पाहणी

Mandrem: सरपंच ॲड. अमित सावंत : एकाच्याच नावावर सहा घर क्रमांक

दैनिक गोमन्तक

Nagarjuna House Goa: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्जुन यांच्या मांद्रे येथील कथित अवैध बांधकामाची मांद्रेचे सरपंच अमित सावंत आणि पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यापूर्वी तशी नोटीस त्यांना बजावली होती. या पाहणीवेळी नागार्जुन यांच्या नावावर येथील सहा घर क्रमांक असल्याची बाब उघडकीस आली.

ॲड. अमित सावंत म्हणाले, या पाहणीनंतर नागार्जुन यांच्या नावावर येथील सहा घर क्रमांक असल्याची बाब उघडकीस आली असून याची सखोल चौकशी करण्यात येईल.

मात्र, नागार्जुन यांच्या वकिलाने या बांधकामासाठी यापूर्वीच सर्व परवाने मिळाल्याचा दावा केला आहे. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण आणि माजी सरपंचांनी सर्व परवाने दिल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले आहे.

ग्रामपंचायतीने 29 डिसेंबर रोजी मांद्रेतील 211/2 बी या क्षेत्रातील मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा ठराव केला होता.

त्यानुसार 7 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता ही पाहणी करण्यात आलीयोग्य त्या दस्तऐवजांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशी नोटीसही पंचायतीने अभिनेते नागार्जुन यांना दिली होती.

नागार्जुन यांच्या मालकीची मांद्रे पंचायतीत सर्व्हे क्रमांक 211/2 बी मध्ये जमीन आहे. या जागेत बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे पंचायतीच्या लक्षात आले. सरपंच ॲड. अमित सावंत यांनी यांनी घटनास्थळाची पाहणी करून हे काम रोखले होते तसेच, अभिनेते नागार्जुन यांना पंचायतीने नोटीसदेखील बजावली होती.

गोवा पंचायतराज कायदा 1994 अंतर्गत पंचायतीच्या हद्दीत कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा खोदकाम करताना पंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे.

या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगत नागार्जुन यांना ते बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT