Kiran Kumar | Raza Murad  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: कलेची सेवा वगैरे काही नसते; पहिल्या ते शेवटच्या रांगेतील प्रेक्षकांचे मनोरंजन हेच महत्वाचे - किरण कुमार

Akshay Nirmale

IFFI 2023: कलेची सेवा वगैरे काही नसते. जे काही आहे ते केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन हेच आहे. तेच महत्वाचे आहे. तेच आमचे काम आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी व्यक्त केले. सोमवारी, इफ्फीच्या संवाद सत्रात ते बोलत होते.

या कार्यक्रमात रणजीत, रझा मुराद, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार असे चार कलाकार सहभागी झाले होते.

खलनायकी भूमिकांचा प्रेक्षकांवरील ठसा, असा या संवाद सत्राचा विषय होता. चित्रपट उद्योग विश्लेषक कोमल नाहटा यांनी या चौघांशी संवाद साधला.

यावेळी किरणकुमार म्हणाले, लोकांना फायटिंग आवडायची. हीरो व्हिलनला मारतो ते आवडायचे. मला माफ करा मी जे बोलतोय ते अनेकांना आवडणार नाही. पण कलेची सेवा वगैरे असे काही नसते. लोकांचे मनोरंजन झाले पाहिजे, तेच महत्वाचे आहे.

पहिल्या रांगेतील आणि अखेरच्या रांगेतील प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच आमचे काम आहे. कारण त्यासाठी त्याने पैसे खर्च केले आहेत. प्रेक्षक थिएटरमध्ये आला आहे तर त्याचे मनोरंजन करा.

रझा मुराद म्हणाले, टॅलेंटच्या बळावरच तुम्हाला अॅक्सेप्टन्स मिळते. काहीही करत असाल तर तुम्हाला स्विकारले जात नाही. प्रेक्षक अनेकांना स्विकारत नाहीत. जर तुमच्यात काही दम नसेल तर काही होत नाही. आमच्यात काही नसते तर आम्ही 52 वर्षे टिकलो नसतो.

फिल्म इन्स्टिट्यूटपासून आम्ही हे शिकत आलो आहे. पण माझे खरे शिक्षण हे प्राण साहेबांसोबत झाले. वक्तशीरपणा, माणूसकी, अभिनय हे सर्व त्यांच्याकडून शिकायला मिळाले. ते प्रचंड प्रामाणिक होते. प्राण यांचे नाव चित्रपटात आले की चित्रपटाचे वजन वाढायचे.

तेव्हा अनेक वर्षे लोक मुलांची नावे प्राण ठेवत नव्हती, असे कोमल नाहटा यांनी यावेळी सांगितले.

किरण कुमार म्हणाले, मला आणि रझा मुराद यांना 52 वर्षे झाली आहेत फिल्म इंडस्ट्रीत. आम्ही दोघांनी 1200 हून अधिक फिल्म्स केल्या आहेत. प्रत्येकी सहाशेच्या आसपास अशा फिल्म्स दोघांनी केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT