Actor Arshad Warsi buys Portuguese inspired home in Goa Saligao 
गोवा

'गोव्यात घर घ्यायची इच्छा होती पण खिशात पैसे नव्हते', अर्शद वारसीने खरेदी केले पोर्तुगीज बनावटीचे घर

गोव्यातील पोर्तुगीज बनावटीच्या या घराच्या प्रेमात अर्शद आणि त्याची पत्नी मारीया पडले आहेत.

Pramod Yadav

Actor Arshad Warsi buys Portuguese inspired home in Goa Saligao

आपल्या कॉमेडीने आणि सिरियस अभिनयाने बॉलिवूडमध्ये अर्शद वारसीने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्शदने अलिकडेच गोव्यातील साळगाव येथे एक घर विकत घेतले आहे. पोर्तुगीज बनावटीच्या या घराच्या प्रेमात अर्शद आणि त्याची पत्नी मारीया पडले आहेत. दोघांनाही हे चांगलेच आवडले असून, अर्शदने गोव्यात घर घेण्याविषयी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'मला नेहमीच गोव्यात घर घ्यायची इच्छा होती, पण त्यावेळी उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. गोवा आणि गोव्यातील लोकांवर माझे नेहमीच प्रेम आहे. गोव्यात घर घेण्याबाबत बोलले तर लोक घर घेण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहा असे सांगायचे पण, माझी इच्छा होती. पुढे अभिनयात करिअर केले आणि अखेर गोव्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले.'

'मला गोव्यात एक जुने पोर्तुगीज बनावटीचे घर मिळाले आहे आणि ते फारच सुंदर आहे. माझी पत्नी मारीया सध्या या घराला सजवण्यासाठी धडपड करत आहे. आमची त्या घराला आहे तसेच ठेवण्याची इच्छा असून, त्यात अति सजावट करण्यात काहीच अर्थ नाही असे वाटते.' असे अर्शद वारसीने म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अर्शदने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गोवा माझ्यासाठी नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे. गेल्या 35-40 वर्षांपासून इथे येत आहे. रेल्वे, बस, बाईक, कार, कोकण शक्ती अशा विविध मार्गांनी मी गोव्यात आलोय. येथे विविध बरे-वाईट अनुभव आले आहेत.

नवीन वर्ष आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी आम्ही गोव्यात यायचो, येथे आम्ही विविध कार्यक्रमांमध्ये डान्स करायचो. त्यावेळी मी 16-17 वर्षांचा होतो; मारिया आणि मी दोघांनीही अगदी लहानपणीच करिअरला सुरूवात केली. असे अर्शद वारसीने म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT