Pundalik Narayan Naik  Dainik Gomantak
गोवा

कार्यकर्ता हा चळवळीचा आधारस्तंभ: पुंडलीक नायक

या मेळाव्यात पेडणे ते काणकोणपर्यंतचे सुमारे 55 कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कार्यकर्ता हा कुठल्याही चळवळीचा आधारस्तंभ असतो. कार्यकर्ता सदैव नम्र असायला हवा. त्याला आपण करतो त्या कामाची योग्य जाणीव असायला हवी, असे ज्येष्ठ साहित्यिक पुंडलीक नायक यांनी सांगितले.

कोकणी भाषा मंडळ, गोवा, रवींद्र केळेकार ज्ञानमंदिर आणि सावईवेरेंचा सख्याहरी यांच्या सहकार्याने नित्यानंद नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित दोन दिवशीय कार्यकर्ता मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्यात पेडणे ते काणकोणपर्यंतचे सुमारे 55 कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्याची सुरुवात कोकणी कार्यकर्ते स्व. नित्यानंद नाईक यांच्या तसबिरीला हार घालून झाली. मुख्याध्यापक अनंत अग्नी यांनी स्वागत केले. अन्वेषा सिंगबाळ यांनी प्रास्ताविक केले. गौरांग भांडीये यांनी आभार मानले. ब्रिजेश शेट देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

पहिल्या सत्रात ‘आम्ही नित्य कार्यकर्ते’ वर डॉ. पूर्णानंद च्यारी यांचे मार्गदर्शन लाभले. दुसऱ्या दिवशी ‘सावईवेरे आणि वळवई परिसरातील चळवळ- यादी आणि अनुभव’ या सत्रात हेमा नायक, महेश नायक, महादेव नायक, प्रकाश नायक, विठ्ठल नायक, राजेंद्र नायक आणि गौतम नायक यांनी अनुभव कथन केले. या सत्राचे संयोजक अनंत अग्नी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT