Electricity Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Accidental Death: शिवोलीतील वीज दुर्घटना; दोषींवर कारवाई करणार!

Accidental Death: शिवोली येथील वीज दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या साहाय्यक लाईनमन कृष्णा पवार याच्या अपघाती मृत्युप्रकरणी संबंधित कनिष्ठ अभियंता तसेच लाईनमनवर कारवाई करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Accidental Death: शिवोली येथील वीज दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या साहाय्यक लाईनमन कृष्णा पवार याच्या अपघाती मृत्युप्रकरणी संबंधित कनिष्ठ अभियंता तसेच लाईनमनवर कारवाई करण्यात येणार आहे.

youtube.com/watch?v=cGQJ13egMlA

या प्रकरणाची सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल मागवला जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

शिवोली येथे गुरुवारी वीज खांबावर चढून दुरुस्ती करताना शॉक लागल्याने कृष्णा पवार यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कृष्णा पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, असेही ढवळीकर यावेळी म्हणाले.

दिवंगताच्या पत्नीला सरकारी नोकरी

कृष्णा पवार यांच्या पश्‍चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या निराधार झाल्याने दिवंगत कृष्णा पवार यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री ढवळीकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT