Hotel Silver Sand Dainik Gomantak
गोवा

हॉटेल सिल्व्हर सँडवरील कारवाई टळली

पीडब्ल्यूडीचे कामगार आलेच नाहीत, इमारतीला आणखी एक वेळ जीवदान

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या कोलवा येथील सिल्व्हर सँड हॉटेल पाडण्यासाठी आज मोठा पोलीस फौजफाटा आणून ठेवला होता. मात्र हे बांधकाम पाडण्यासाठी जी यंत्रसामग्री आणण्यासाठी जी पैशांची तरतूद करायला पाहिजे होती ती न झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले पथक पाठविलेच नाही. त्यामुळे या हॉटेल इमारतीला आणखी एक वेळ जीवदान मिळाले.

या बांधकामाच्या विरोधात कोलवा सिव्हिक फोरमच्या ज्यूडीत आल्मेदा यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने (Court) हे बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज ही कारवाई होणार होती. कोलवा पंचायतीचे सचिव अमोल तिळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार सीआरझेड, वीज खाते यांची पथके या ठिकाणी जमा झाली मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले पथक पाठविलेच नाही.

यासंदर्भात याचिकादार आल्मेदा यांनी तीव्र नापसंती व्यक्त करताना अशा कारवाईसाठी आता सीआरझेड प्राधिकरणाने स्वतःची यंत्रणा उभारायची गरज त्यांनी व्यक्त केली. अन्यथा अशा बेकायदेशीर (Illegal) बांधकामांना अभय मिळत राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.

आल्मेदा यांनी या बांधकामाविरोधात सीआरझेड प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्राधिकरणाने हे बांधकाम मोडण्याचा आदेश (Order) जारी केला होता. पण हॉटेल व्यवस्थापनाने या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळविल्याने यापूर्वीही ही कारवाई एकदा टळली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT