Court Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party च्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई न्यायालयाकडून रद्द

दिलीप प्रभुदेसाई व मोहनदास लोलयेकर यांना दिलासा

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी दिलीप प्रभुदेसाई व मोहनदास लोलयेकर या दोन पदाधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचा बॉण्ड द्यावा हा सासष्टीचे उपजिल्हाधिकारी प्रसाद वळवईकर यांनी दिलेला आदेश कायद्याच्या चौकटीत बसत नाही. असे नमूद करून दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी आज रद्द ठरवून या कारवाईस स्थगिती दिली. ( Action against office bearers of Goa Forward Party canceled by court )

फातोर्डा येथील मंजूर झालेली कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने अडवून ठेवल्याने 31 डिसेंबर 2021 रोजी गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेली पोलिसांनी तो अडविल्यामुळे या आंदोलनकांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. त्यावेळी सार्वजनिक वाहतुकीत अडथळा आणल्याचा आरोप ठेवून पोलिसांनी एकूण 45 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला होता.

हे प्रकरण उपजिल्हाधिकारी वळवईकर यांच्याकडे पाठविले असता त्यांनी सर्व आंदोलकांनी शांतता राखण्याची ग्वाही देऊन 20 हजार रुपयांचा बॉण्ड द्यावा असा आदेश दिला होता. आपली बाजू ऐकून न घेताच उपजिल्हाधिकारी वळवईकर यांनी आदेश दिला असा आक्षेप घेत प्रभुदेसाई आणि लोलयेकर यांनी या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

हा आदेश देताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक प्रक्रियाही पूर्ण केली नाही असे नमूद करीत न्या. डिसिल्वा यानी हा आदेश रद्द केला. प्रभुदेसाई आणि लोलयेकर यांच्या बाजूने ऍड.शैलेश रेडकर यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

हेरिटेज संरक्षणात विलंब भोवणार, केंद्रीय प्राधिकरणावर कोर्टाची नाराजी; अधिकाऱ्यांनाही इशारा

खरी कुजबुज: भाजपाला उशिरा आलेली जाग!

SCROLL FOR NEXT