Vagator Accident News Dainik Gomantak
गोवा

Vagator Accident Case: वागातोर अपघात प्रकरणातील आरोपी सचिन कुरूपला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

म्हापसा न्यायालयाकडून आता 14 दिवसांची न्यायिक कोठडी

Kavya Powar

Vagator Accident Case: शनिवारी रात्री वागातोर येथे घडलेल्या भीषण अपघातात स्थानिक महिला रेमेडियाना उर्फ रोमी आल्बुकेर्क (56) यांचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे ड्रंक अँड ड्राईव्हचा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे . दरम्यान याप्रकरणी फोर्ड गाडीचा चालक सचिन कुरूप याला म्हापसा न्यायालयाकडून आता 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी सचिन कुरूप हा पाच दिवस हणजूण पोलीस कोठडीत होता. काही दिवस हणजूण कोठडीत घालवल्यानंतर काल (गुरुवारी) सकाळी हणजूण पोलिसांकडून त्याला म्हापसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून कुरूप याला वरील कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्थानिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या अपघातानंतर वाहतूक पोलीस गौरीश परब यांनी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना विशेष सूचना केल्या आहेत. ते म्हणाले की, गोव्यात फिरताना मद्यपान करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. मोटार वाहन नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीआखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींना त्यांच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT