Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : पोलिस संरक्षणातून चोर पसार; दोघे कॉन्स्टेबल तत्काळ निलंबित

गोमेकॉत हातावर दिली तुरी : लुकआऊट नोटीस

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोमेकॉत उपचारासाठी आणलेल्या वास्को चोरी प्रकरणातील संशयित पी. रमेश (50) याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. याप्रकरणी आगशी पोलिसांनी संशयित रमेशविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तसेच संशयितावर पहारा ठेवण्यात हयगय केल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अशोक अधुर आणि कॉन्स्टेबल गौरेश सातार्डेकर या दोघांना रात्री उशिरा निलंबित केले. हा आदेश दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी जारी केला.

दोन महिन्यांपूर्वी संशयित रमेश याने पार्किंगमधील कारची काच फोडून सुमारे 2.50 लाखांची रक्कम लंपास केली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा तो चोरी करण्यासाठी आला असता, तक्रारदाराने त्याला एका वाहनाजवळ उभा असलेला पाहिला. त्यानंतर पाठलाग करून त्याला पकडले आणि वास्को पोलिसांच्या स्वाधीन केले.

त्याने अडीच लाखांच्या चोरीची कबुली दिली होती. याप्रकरणी वास्को पोलिसांत यापूर्वीच गुन्हा नोंद झाला होती. तक्रारदाराने संशयिताची सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून चोराची माहिती मिळवली होती. त्यामुळेच तो दुसऱ्यांदा वास्कोत आला असता त्याला ओळखणे सोपे झाले.

अटक केल्यावर रमेशने पाय दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला चिखली जिल्हा इस्पितळात नेले. मात्र, तेथे एक्स-रे मशीन नसल्याने त्याला गोमेकॉत आणले होते. आज सकाळी श्‍वान पथकाने रमेशचा शोध घेतला. मात्र, श्‍वान जवळच झाडांमध्ये जाऊन थांबले. रमेशच्या शोधासाठी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Puzzle Car Parking: मडगावात 'पझल कार पार्किंग'ला हिरवा कंदील, वाहतूक व्‍यवस्‍था सुुधारणार; 7.77 कोटी रुपयांचे काम 'एसएमएस' कंपनीला

8th Pay Commission: थकबाकीची 'जॅकपॉट' ऑफर! कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार १४ लाख रुपये? पाहा काय आहे संपूर्ण गणित

खरी कुजबुज: 'तो' राजकारणी कोण? म्हापशात चर्चा

Goa Accident: रस्‍ता चुकला, घात झाला; अपघातात दाम्‍पत्‍याचा मृत्‍यू, कारची दुचाकीला धडक, बांबोळीतील घटना

सॅम्‍युअलला लावली 'थर्ड डिग्री'? पोलिसांची चौकशी सुरू, अनेक अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT