Quepem Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Quepem Municipal Council: अर्थसंकल्पीय बैठकीला लेखापालच गैरहजर, केपे पालिकेची बैठक रद्द

आमचा वेळ खराब करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती का असा सवाल नगराध्यक्ष व नगरसेवकानी केला.

सुशांत कुंकळयेकर

Quepem Municipal Council: केपे पालिकेच्या आज बोलावण्यात आलेल्या महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय बैठकीला लेखापालच अनुपस्थित राहिल्याने सदर बैठक रद्द करून पुढे ढकलण्यात आली. अशा महत्त्वाच्या बैठकीला लेखापाल गैरहजर कसे राहू शकतात? असा संतप्त सवाल माजी नगराध्यक्ष दयेश नाईक यांच्यासह नगरसेवकानी उपस्थित केला.

आमचा वेळ खराब करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती का असा सवाल नगराध्यक्ष व नगरसेवकानी केला.

केपे पालिकेच्या आज झालेल्या बैठकीला पालिकेची लेखापाल तसेच पालिका अभियंता अनुपस्थित राहिल्याने उपस्थित नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. आजच्या बैठकीत महत्वपूर्ण असा पालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार होता पण सदर लेखापाल व अभियंता या पालिका बैठकीला न सांगता कसे अनुपस्थित राहू शकतात असा प्रश्न नगरसेवक दयेश नाईक, अमोल काणेकर व फिलू डीकॉस्ता यांनी उपस्थित केला.

बैठक सुरू होण्यापूर्वी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी नगरसेवकांना सूचना देण्याची गरज होती पण लेखापाल व अभियंत्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प मांडण्याचा तयारीत असताना बाकी नगरसेवकांनी याला जबरदस्त विरोध करून शिरवईकर यांना धारेवर धरले.

अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा शिरवईकर यांना होती पण त्यांनी याची माहिती पालिका मंडळाला दिली नसल्याने नगरसेवक दयेश नाईक व फिलू डीकॉस्ता यांनी संताप व्यक्त करून आमचा वेळ वाया घालवला असे सांगितले.

नगराध्यक्ष शिरवईकर यांनी सदर बैठक लवकरच बोलावणार आल्याचे यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT