Accidental death of a cricketer from Canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोण येथील क्रिकेटपटूचा अपघाती मृत्‍यू

गंभीर दुखापत झाल्‍याने झाला मृत्‍यू

दैनिक गोमन्तक


काणकोण : नुवे-श्रीस्थळ येथील राजन रमेश वेळीप (21) या युवकाचा खड्डे-बाळ्ळी येथे झालेल्‍या अपघातात मृत्‍यू झाला. वेळीप हा दुचाकीवरून काणकोणला येत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्‍याला जोरदार धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला आहे. राजनच्‍या पार्थिवावर आज दुपारी नुवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तो उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. त्याच्या पश्‍‍चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. दरम्यान, उपचारासाठी वेळ गेल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. (Accidental death of a cricketer from Canacona)

दरम्यान, करमणे दाबाळ येथील रुपा शेट पारकर या महिलेच्या सावर्डे येथे झालेल्या खुनाची घटना ताजी असतानाच आज बुधवारी कुडचडे अग्निशमन दल कार्यालयाच्या जवळ असलेल्या शेतीत आणखी एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परत एकदा कुडचडे शहर चर्चेत आले आहे. सापडलेला मृतदेह 34 वर्षीय पुरुषाचा असून तो आज बुधवारी सकाळी स्थानिकांना आढळून आल्याने ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. कदाचित हाही खुनाचाच प्रकार असावा अशी शंका काही जणांनी व्यक्त केली.

दरम्यान पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ज्याचा हा मृतदेह आहे त्याला दारू प्यायचे व्यसन होते. दारू प्यायलेल्या अवस्थेत तो या भागात पडला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT