Goa Traffic Police Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police Accident: देवदर्शनाला गेलेल्या वाहतूक पोलिसांच्या गाडीला अपघात; एका कॉन्स्टेबलचा मृत्यू

पाच जखमी, कारवार-मडगाव महामार्गावर तानशी जंक्शनजवळ घटना

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Traffic Police Accident: दक्षिण गोव्यातील काणकोण येथे देवदर्शनासाठी गेलेल्या हणजुणे (Anjuna) वाहतूक पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे.

यात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे समजते. कारवार-मडगाव महामार्गावर तानशी जंक्शनजवळ हा अपघात झाला.

हणजुणे येथील वाहतूक पोलिसांत कार्यरत असलेले काही कर्मचारी स्विफ्ट कारमधून काणकोण येथे देवदर्शनासाठी गेले होते.

पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मासेवाहू कंटेनर (MH 08W 8170) आणि त्यांच्या स्विफ्ट (GA 11A 1805) कारमध्ये अपघात झाला. यात कॉन्स्टेबल राकेश विर्नोडकर यांचा मृत्यू झाला आहे.

तर कालिदास शेट्ये (आगरवाडा, पेडणे) , कृष्णा पालयेकर (पालिये, पेडणे) , प्रितेश मांद्रेकर (हरमल, पेडणे) आणि राजेश पटेकर (मांद्रे, पेडणे), राकेश वीरेंदर (शिवोली) हे पाचजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी गोमॅकोमध्ये दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT