Goa Accident At Mollem  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस-इनोव्हा कारचा भीषण अपघात

6 जण जखमी, सुदैवाने जीवीतहानी नाही, दोन्ही वाहनांचे मात्र मोठे नुकसान

Akshay Nirmale

Goa Accident: गोव्यातील मोले येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर खासगी आरामदायक बस आणि इनोव्हा कार यांच्यात मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झालेली नाही. तथापि, सहा जण जखमी झाले आहेत.

या अपघातात इनोव्हा कारचा चालक जखमी झाला आहे. त्याच्या पायाला जबर मार लागला आहे. तर इनोव्हा कारमधील सहाही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तिस्क येथील पिळये आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

तिथून एकाला पुढील उपचारासाठी गोमॅकोमध्ये आणण्यात आले आहे. तर तिघांना फोंडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

खासगी बस बंगळूरहून गोव्याकडे येत होती. तर विरोधी दिशेने येणाऱ्या भरधाव इनोव्हाने बसला जोरदार धडक दिली. इनोव्हा कार वेगात होती. त्यामुळे ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार येत असल्याचे पाहून बसच्या ड्रायव्हरने बस आणखी आतल्या बाजूला वळवली.

त्यामुळे समोरासमोर धडक न होता. बसच्या एका कोपऱ्यात इनोव्हाची धडक बसली. तथापि, दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News: मुस्लिम पती, 5 मुलं अन् 45 वय; आता 26 वर्षांनी लहान हिंदू प्रियकरासोबत मंदिरात थाटला संसार! 'सीमा'ची अजब प्रेम कहाणी

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

SCROLL FOR NEXT