Accident dainikgomantak
गोवा

ढवळी येथे अपघातात महाराष्ट्रातील चारजण किरकोळ जखमी

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

दैनिक गोमन्तक

फोंडा: ढवळी येथे पर्यटकांच्या कारगाडीला अपघात होऊन चारजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास घडला.

गोवा पर्यटनासाठी आलेल्या पनवेल - महाराष्ट्रातील (एमएच४६ बीक्यू ८२३०) कारगाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने कारगाडीने रस्त्याच्या दुभाजकाला ठोकर दिली. त्यानंतर ती उलटली. या अपघातात कारगाडीमधील पनवेल येथील समय थोरात (वय २५), रोशनी कांचन (वय २६), विकास त्रिपाठी (वय २९) व ट्विंकल सुलझले (वय २६) हे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले.

चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात (Accident) झाला. अपघातानंतर अग्निशामक दलाला कळवल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दल आणि स्थानिकांनीजखमींना बाहेर काढून उपचारासाठी मदतकार्य केले. तर फोंडा पोलिसांनी (Phonda Police) अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: काँग्रेसच्या नेत्यांनीच केले होते विरियातोंविरोधात काम!

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT