MAPUSA MUNICIPAL COUNCIL Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council : म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; संशयितांवर गुन्हा

कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रावजी तुयेकर कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : कामरखाजन-म्हापसा येथे मलनिस्सारण प्रकल्पाजवळ उभारलेल्या एका बेकायदा पत्र्याच्या शेडला काम बंद ठेवण्यास सांगून कारणे दाखवा नोटीस बजावण्यासाठी पालिका कर्मचारी गेले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रावजी तुयेकर कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

ही घटना सोमवार, 22 रोजी दुपारी घडली. संशयित दत्तराज रावजी तुयेकर, रावजी तुयेकर आणि रावजी यांच्या पत्नीविरुद्ध हा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी म्हापसा पालिकेचे पर्यवेक्षक ईश्वर नाईक यांनी पोलिसांत तक्रार दिली.

कामरखाजन येथे मलनिस्सारण प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने संशयितांनी बेकायदेशीर पत्र्याचे शेड उभारले आहे. याची माहिती मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम बंद ठेवण्यास सांगून कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

ही नोटीस देण्यासाठी पोलिस व दंडाधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात पालिका कर्मचारी पथक घटनास्थळी गेले होते. या पथकात कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक व कर्मचारी होते. मात्र, नोटीस न घेताच संशयितांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.

तसेच तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून माघार घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

IPL 2026 पूर्वी आरसीबीला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाबाहेर, 'वैयक्तिक कारणा'मुळे स्पर्धेतून माघार

Curchorem: कुडचडे सेक्स स्कँडलचा तपास आता 'क्राईम ब्रांच'कडे, नवे धागेदोरे हाती लागणार

VIDEO: 'धुरंधर' चा पाकड्यांना धसका? गल्लीबोळ्यामध्ये पोलिस सुरक्षा वाढवली, प्रत्येकाचं आयडी करतायत चेक, पाहा व्हिडिओ

Gogol Murder Case: घाेगळ खूनप्रकरणी नवी माहिती! सहआरोपीला बेंगळुरू विमानतळावर अटक VIDEO

SCROLL FOR NEXT