World ‘Wildlife Day’ Dainik Gomantak
गोवा

पृथ्वीवरील 50 टक्के वन्यजीव गेल्या 40 वर्षांत नष्ट

न्यजीवांच्या ऱ्हासाचे हे प्रमाण असेच राहिले तर येत्या 30 वर्षांत मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरचे वन्यजीवन नष्ट होतील

दैनिक गोमन्तक

पणजी: पृथ्वीवरील 50 टक्के वन्यजीव गेल्या 40 वर्षांत नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन्यजीवांच्या ऱ्हासाचे हे प्रमाण असेच राहिले तर येत्या 30 वर्षांत मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरचे वन्यजीवन नष्ट होतील आणि त्याचे गंभीर परिणाम मानव जातीला भोगावे लागतील, असा इशारा युनोच्या वन्यजीव विभागाने दिला आहे.पृथ्वीवरील त्या-त्या भागातील प्रदेशनिष्ठ प्राणी व वनस्पती यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याकरिता 3 मार्च हा जागतिक ‘वन्यजीव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. (About 50 percent of the world's wildlife has been destroyed in the last 40 years)

दिवसभर भरगच्च कार्यक्रम

जागतिक वन्यजीव (World Wildlife Day) दिवसाच्‍या निमित्ताने वन खाते आणि इतर संघटनांच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी समुद्र किनारपट्टीवरील वन्यजीव व त्यांची माहिती व्हावी यासाठी ‘बोट राइट्स’ उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. तर, बोंडला अभयारण्यात मुलांसाठी वन्यजीव जागृती, संवाद आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किनारपट्टीच्या भागात काम करणाऱ्या ‘दृष्टी’ या संस्थेला जलचरांचे संरक्षण करण्यासाठी साहित्‍य प्रदान सोहळा पणजीत होणार आहे.

‘प्रजातींची पुनर्प्राप्ती’ ही संकल्‍पना

‘परिस्थितिकीमधील मुख्य प्रजातींची पुनर्प्राप्ती’ ही या वर्षीच्या जागतिक वन्यजीव दिवसाची संकल्‍पना आहे. प्रामुख्याने यात अत्यंत धोकादायक प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न अंतर्भूत आहेत. पृथ्‍वीवरील नष्ट होत चाललेले प्राणी, पक्षी आणि वनस्पती याकडे लक्ष वेधले जाणार आहे. पक्ष्यांमध्ये विविध प्रकारची गिधाडे, बदके, धनेश, हिमालयन क्विल याबरोबर प्राण्यांमध्ये वाघ, हिम बिबटे, एकशिंगी गेंडे, हिमालयीन थार, गोल्डन मकाक यासारख्या प्राण्यांच्या संवर्धनावर पुढील वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत.

राज्‍यात पक्ष्‍यांच्‍या प्रजातींपैकी पुठ्ठ्याचे गिधाड आणि लांब चोचीचे गिधाड या दोन प्रजाती नष्‍ट होण्‍याच्‍या मार्गावर आहेत. शिवाय वाघ व छोट्या हरणाच्‍या प्रजाती संकटात आहेत. त्‍यांच्‍या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत.

- परेश परोब, उपवनसंरक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT