Illegal Goa Made Liquor Sealed On Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Canacona : वाईन शॉपमध्‍ये तोडफोड केल्‍याच्‍या आरोपात तथ्‍य नाही : अभिजीत देसाई

दुकानदाराविरोधात अबकारी खात्‍याकडे केली होती तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Wine Shop : बाळ्‍ळी येथील होलसेल वाईन शॉपमध्‍ये मोडतोड केल्‍याची जी माझ्‍याविरोधात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे, त्‍यात कुठलेही तथ्‍य नाही. या शॉपच्‍या बाजूला असलेल्‍या रेस्‍टॉरंटमध्‍ये देण्‍यात आलेल्‍या बिअरच्‍या मुदतीची तारीख उलटून गेल्‍याने (एक्‍स्‍पायरी डेट) मी या दुकानदाराविरोधात अबकारी खात्‍याकडे तक्रार केली आहे.

त्‍याचाच राग काढण्‍यासाठी ही खोटी तक्रार माझ्‍याविरोधात दाखल करण्‍यात आल्‍याचा दावा खोतीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत देसाई यांनी केला.

सदर घटना 8 जुलै रोजी घडली होती. मी आणि माझे काही मित्र रात्रीच्‍या वेळी बाळ्‍ळीच्‍या त्‍या रेस्‍टॉरंटमध्‍ये गेलो होतो. तेथे आम्‍हाला तारीख एक्‍स्‍पायर झालेली बिअर देण्‍यात आली. यासंबंधी त्‍या दुकानदाराला जाब विचारण्‍यात आला.

त्‍यानंतर जवळच्‍या वाईन शॉपमध्‍ये आणखीही कित्‍येक बिअर अशा आढळून आल्‍या की त्‍यांच्‍या मुदतीची तारीख उलटून गेली होती. या प्रकरणी मी अबकारी खात्‍याकडे तक्रार केली. त्‍यानंतर खात्‍याने कारवाई केली.

ही तक्रार करू नये यासाठी माझ्‍या‍वर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न झाला. परंतु मी तक्रार दाखल केलीच. त्‍याचा बदल म्‍हणून माझ्‍याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार देण्‍यात आली असल्‍याचे देसाई यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT