Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीचे अपहरण; संशयिताला हरियाणातून अटक

मालपे येथून अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी अनिल रावत (21 रा. मूळ सतना मध्यप्रदेश व सध्या मालपे) याला रविवारी गुरगाव येथून हरियाणा पोलिसांच्या मदतीने अटक केली.

दैनिक गोमन्तक

पेडणे : मालपे येथून अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी अनिल रावत (21 रा. मूळ सतना मध्यप्रदेश व सध्या मालपे) याला रविवारी गुरगाव येथून हरियाणा पोलिसांच्या मदतीने अटक केली. तर फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले. संशयित एमव्हीआर कंपनीत मजूर म्हणून काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ बिहार येथील व एमव्हीआर कंपनीत मजूर म्हणून काम करणाऱ्या एकाने अनिल रावतने आपल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार पेडणे पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पेडणे पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासात संशयित गुरगाव, हरियाणा येथे पळवून नेलेल्या मुलीसमवेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक नवीन देसाई,सुमेधा नाईक,पोलिस कॉस्टेबल सागर खोर्जुवेकर यांचे पथक हरियाणा येथे गेले. तेथे हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने संशयित व मुलीला ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक शोभीत सक्सेना व पेडणे पोलिस उपअधीक्षक सिध्दांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT