Devanagari script schools Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

Goa Assembly Konkani Debate: हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक प्रश्न विचारले

Akshata Chhatre

पणजी: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात नवीन शिक्षण धोरणावरी (NEP 2020) प्रश्नावरून झाली. हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक प्रश्न विचारले, तर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी शिक्षण माध्यमाच्या निवडीवर सवाल उपस्थित केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा NEP च्या उद्दिष्टांवर प्रकाश

NEP अंतर्गत शाळेच्या वेळेत सुधारणा करण्यासाठी शिक्षण खाते कसे काम करतेय? या आमदार फेरेरा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन शिक्षण धोरणांतर्गत (NEP 2020) शालेय कामकाजाच्या वेळेचे सुसूत्रीकरण करण्यावर सरकार काम करत असल्याचे स्पष्ट केले.

"१२०० तास म्हणजे केवळ 'शिकवणे' नव्हे, तर 'शिकणे' होय," असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करून त्यांना आनंददायी, तणावमुक्त आणि अनुभवाधारित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, हाच या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नवीन शिक्षण धोरण हे व्यावहारिक उपक्रम (hands-on activities) आणि प्रकल्प-आधारित शिक्षणावर (project-based learning) भर देते. याच उद्देशाने शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासावरही सरकार भर देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारी शाळांमध्ये आधुनिकीकरणाचे काम आधीच सुरू झाले असून, अनुदानित शाळांच्या व्यवस्थापनांनाही NEP च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, शैक्षणिक संकुल (complexes) विकसित करण्याचे कामही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले.

शिक्षण माध्यम आणि रोमन कोकणीवर सविस्तर स्पष्टीकरण

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी १२ तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या शाळा, त्यातील काही सरकारी आणि काही अनुदानित असल्याचा उल्लेख करत, शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना शिक्षणाचे माध्यम कसे निश्चित केले? असा प्रश्न उपस्थित केला.

यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कोकणी भाषेच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले. NEP टास्क फोर्सने रोमन लिपीचा उल्लेख 'ए.बी.सी' या अक्षरांच्या संदर्भात केला होता, तो विशिष्टपणे 'रोमन कोकणी' असा नव्हता. देवनागरी लिपी मराठी, कोकणी आणि हिंदीसाठी वापरली जाते, तर रोमन लिपी वेगळी आहे. कोकणी भाषा रोमन लिपीत म्हणजेच इंग्रजीमधून लिहिता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या शिक्षण संस्था कोकणी भाषेत शाळा सुरू करण्याची मागणी करतील, त्यांना अनुदान देऊन देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास मदत केली जाईल. त्याचबरोबर, मराठी माध्यमांच्या शाळा बंद होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

नववीसाठी पुढील वर्षापासून नवी पाठ्यपुस्तके

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) इयत्ता नववीसाठी पुढील वर्षापासून नवीन पाठ्यपुस्तके लागू केली जातील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोरणाशी सुसंगत होईल. विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करून त्यांना गुणवत्तापूर्ण आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यावर भर दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT