Vasco  Dainik Gomantak
गोवा

Abandoned Vehicles in Vasco: बेवारस वाहने भंगारात जमा; मुरगाव नगरपालिकेची कारवाई

वास्कोत अनेक सरकारी कार्यालयांची वाहने भंगार अवस्थेत रस्त्यावर चार ते पाच वर्षापासून धूळ खात पडली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्कोतील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून बेवारस अवस्थेत असलेल्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनावर मुरगाव नगरपालिके तर्फे कारवाई करण्यात आली. बेवारस वाहने उचलून भंगारात टाकण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे. वास्कोतील रस्त्यावरील बेवारस वाहनांची ओळख पटवून वाहतुक पोलिसांनी वाहन व त्या वाहनांचे क्रमांक मुरगाव नगरपालिकेला सादर केले होते. त्या आधारावर पालिके मार्फत कारवाई केली असल्याची माहिती मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस यांनी दिली.

Vasco

मुरगाव नगरपालिकेच्या विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात बेवारस स्थितीमधील वाहने अनेक वर्षापासून रस्त्यावर पार्क केलेली आहेत. या बेवारस वाहनामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे पालिका प्रभागासोबत वास्कोतील स्वतंत्रपथ मार्ग, एफएल गोम्स मार्ग, दत्तात्रेय मार्ग, डॉ. लुईस मार्ग यासह महत्वाच्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.

वास्को वाहतुक पोलिसांनी बेवारस वाहनांविरोधात मोहीम सुरू करून, या वाहनांवर कारवाईसंबधिची कागदपत्रे मुरगाव नगरपालिकेला सादर केली. मुरगाव नगरपालिका व वास्को वाहतुक पोलिसांनी आज (गुरुवार, दि.09) शहरातील बेवारस वाहनावर कारवाई केली. यापुढेही शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करून भंगारात टाकण्यात येईल असे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस यांनी सांगितले.

वास्कोत अनेक सरकारी कार्यालयांची वाहने भंगार अवस्थेत रस्त्यावर चार ते पाच वर्षापासून धूळ खात पडली आहेत. या वाहनांवर सुद्धा मुरगाव नगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मुरगाव तालुका सहाय्यक वाहतुक संचालकाच्या कार्यालयासमोर अंदाजे पाच वाहने भंगार अवस्थेत आहे. यात मुरगाव गटविकास कार्यालया बरोबर मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाची वाहने आहेत. तसेच शहरातील इतर ठिकाणी सरकारी वाहने अनेक वर्षा पासून बेवारस स्थितीत आहेत. यावर पालिकेने व वास्को वाहतुक पोलिसांनी कारवाई करावी. अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT