AAP Dainik Gomantak
गोवा

‘आप’ बनेल गोव्यातील सामान्‍य जनतेचा आवाज

राहुल म्‍हांबरे: विजयी उमेदवारांचा सन्‍मान; पुढील रणनीतीवर चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभेत आम आदमी पक्षाने केलेला प्रवेश ही महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक घटना आहे. आमचा पक्ष आणि निवडून आलेले पक्षाचे दोन्‍ही आमदार राज्यातील सामान्य माणसाचा आवाज बनून त्‍यांच्‍या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक आणि निष्‍ठेने प्रयत्‍न करतील, अशी ग्‍वाही ‘आप’चे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाने आपल्या सर्व उमेदवारांसह पुढील रणनीती ठरविण्यासाठी पणजीतील इंटरनॅशनल सेंटरमध्ये बैठक बोलावली होती.

या बैठकीत बाणावली मतदारसंघात चर्चिल आलेमाव या बलाढ्य प्रतिस्‍पर्धी उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेले ‘आप’चे विजयी उमेदवार कॅप्टन व्‍हेंझी व्‍हिएगस आणि वेळ्‍ळीतील क्रुझ सिल्‍वा (ज्‍यांनी सावियो डिसिल्‍वा या आपल्‍या प्रतिस्‍पर्धी उमेदवाराला पाणी पाजले) या दोघांचा माजी आमदार एलिना साल्ढाणा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्‍यानंत म्‍हांबरे बोलत होते.यावेळी माजी मंत्री महादेव नाईक, एलिना साल्‍ढाणा यांचीही भाषणे झाली. यापुढील काळात लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आम आदमी पक्ष सदैव सक्रिय राहावा आणि पक्षसंघटना मजबूत करण्यावर तातडीने लक्ष केंद्रित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT