Goa Aap Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: महिलांसाठी ‘आप’चे ‘सुरक्षा ॲप’; सुरक्षा संवाद बैठकीत निर्णय

Womens Safety App: बाणावली मतदारसंघात आपच्या महिला आघाडीच्या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातील महिलाही सुरक्षित नसून पोलिसही निष्क्रिय झाल्याने महिलांचा या सरकारी सुरक्षा यंत्रणेवरील विश्र्वास उडाला आहे. या परिस्थितीत आम आदमी पक्ष राज्यात स्वतःचे ‘सुरक्षा ॲप’ लाँच करणार आहे, अशी माहिती आपचे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दिली.

आपची महिला सुरक्षा संवाद मोहीम आजपासून सुरू झाली असून याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज बाणावली मतदारसंघात आपच्या महिला आघाडीच्या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यात ९ मतदारसंघांतील महिला नेत्यांनी भाग घेतला होता. याच बैठकीतून या सुरक्षा ॲपची कल्पना पुढे आली असून दोन महिन्यांत ते सुरू करण्याची आमची तयारी आहे. या ॲपमधून पिढीत महिलांना तत्काळ सुरक्षा मिळवून देण्याची सोय असेल, असे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी स्वयं सुरक्षा कार्यक्रम आखून त्याद्वारे संपूर्ण राज्यात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याबरोबरच पिढीत महिलांना मोफत कायदेशीर सल्ला आणि इतर मदत देण्यासाठीही एक गट तयार केला जाईल, तसेच शाळांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यासाठीही आम्ही पुढाकार घेऊ, असे व्हिएगस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT