AAP in Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकीतही आपची उतरण्याची तयारी

कुंकळ्ळी मतदारसंघात आढावा : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही प्रयत्न

दैनिक गोमन्तक

मडगाव : सुरवातीला जिल्हा पंचायतीत एक तर नंतर विधानसभा निवडणुकीत गोव्यात दोन आमदार निवडून आणणाऱ्या आम आदमी पक्षाने येणाऱ्या पंचायत निवडणुकीसाठीही तयारी सुरू केली असून त्या दृष्टीने आज कुंकळ्ळी मतदारसंघात त्याची चाचपणीही सुरू झाली.

आज वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन या मतदारसंघात पंचायत निवडणूक लढविण्यास कोण इच्छुक आहेत त्याची माहिती त्यांनी घेतली. पंचायत निवडणुकीत पक्ष थेट भूमिका घेणार की अन्य काही हे जरी ठरले नसले तरी या निवडणुकीद्वारे पक्षाचा गाव पातळीवर विस्तार करण्याचे ठरले अशी माहिती मिळाली आहे.

यावेळी आपचे कार्यकारी सचिव प्रशांत नाईक, महिला विभागाच्या उपाध्यक्ष पेट्रीसिया फेर्नांडिस, कुंकळ्ळी गटाचे सरचिटणीस जॉर्सन फेर्नांडिस, युवा आघाडीचे नेते वैभव फळदेसाई हे उपस्थित होते.

यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आमदार सिल्वा यांनी सांगितले. सध्या दक्षिण गोव्यात आपचे वेळ्ळी आणि बाणावली येथे दोन आमदार निवडून आलेले असून इतर काही मतदारसंघातही पक्षाला चांगली मते पडली आहेत. ही स्थिती दक्षिण गोव्यात पक्षासाठी पोषक असून लोकसभेत फायदा होऊ शकतो असे सिल्वा यांनी सांगितले.

आपण वेळ्ळी येथील आमदार असलो तरी कुंकळ्ळी मतदारसंघातही आपण लक्ष देणार असून सरकारी योजनांचा कुंकळ्ळीच्या लोकांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल असे सिल्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT